Home Loan Tips: स्मार्ट व्हा आणि गृहकर्जाचे हप्ते करा कमी; व्याजातही पैसे वाचतील, ही ट्रिक वापरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:06 IST
1 / 7घर घेण्यासाठी अनेकांसमोर गृहकर्जाशिवाय पर्याय नसतो; पण गृहकर्जाचा हप्ताही मोठा आणि दीर्घकालीन असतो. त्यात मुद्दल व व्याज याचे मिश्रण असते. साधारणत: जेवढी मुद्दल असते, तेवढेच व्याज भरावे लागते. मात्र, त्यात निश्चितच बचत करणे शक्य आहे. हा बचतीचा मार्ग आहे प्री-पेमेंटचा. त्यातून गृहकर्जाचे हप्ते तुम्ही कमी करू शकता.2 / 7गृहकर्ज घेतानाच प्री-पेमेंटचा पर्याय उपलब्ध असतो. प्री-पेमेंटचा योग्य कालावधी कोणता, हे जाणून घेणे यात आवश्यक आहे. गुंतवणूक सल्लागारांच्या मते बँका सुरुवातीच्या काळात व्याज वसूल करतात. त्यामुळे ईएमआयचे ओझे हलके करण्यासाठी सुरुवातीच्या काळापासूनच प्री-पेमेंट करणे आवश्यक आहे.3 / 7नियमित मासिक हप्त्यापेक्षा जास्त रक्कम स्वेच्छेने भरल्यास त्यास प्री-पेमेंट असे म्हटले जाते. ही अधिकची रक्कम थेट मुद्दलात जमा होते. त्यामुळे मुद्दल कमी होऊन व्याजाची रक्कम घटत जाते. त्यामुळे तुमचे कर्जाचे हप्ते लवकर संपतात. यामुळे कर्जदाराची बचत हाेते.4 / 7समजा तुम्ही ७.५० टक्के व्याजदराने २० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी म्हणजेच २४० महिन्यांसाठी घेतले आहे. तर स्थिती अशी राहील.5 / 7तुम्ही संपूर्ण मुदतीपर्यंत हप्ते फेडणार असाल, तर तुम्हाला मासिक हप्ता १६,११२ रुपये येईल. एकूण ३८,६६,८४७ रुपये तुम्हाला भरावे लागतील. त्यात व्याज १८,६६,८४७ रुपये असेल. 6 / 7समजा १६,११२ रुपयांच्या मासिक हप्त्यासोबतच १ हजार रुपये दरमहा प्री-पेमेंट केले तर तुमचे २.७० लाख रुपयांची बचत होईल. २४० मासिक हप्त्यातून २९ मासिक हप्ते कमी होतील.7 / 7गृहकर्जाच्या व्याजात मोठी रक्कम जाते. त्यातही पहिल्या ५ वर्षांमध्ये व्याज सर्वाधिक असते. नियमितपणे कर्ज फेडल्यास पुढीलप्रमाणे घट होते. सुरुवातीची ५ वर्षे ७.७%, त्यापुढील ५ वर्षे १९.२%, तिसऱ्या ५ वर्षे ३६.४%, चौथ्या ५ वर्षे ६९%, शेवटची ५ वर्षे संपूर्ण कर्ज फिटलेले