शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ग्रेटच... सर्वाधिक महिलांना नोकऱ्या देणारी कंपनीही टाटांचीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 11:43 IST

1 / 15
नवी दिल्ली : देशातील माेठ्या कंपन्यांमध्ये संचालक मंडळात महिलांची संख्या वाढत आहे. मात्र, महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण त्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. देशात सर्वाधिक महिला कर्मचारी काेणत्या कंपनीत आहेत? तर त्याचे उत्तर आहे टाटा कन्सल्टंसी लिमिटेड. टाटा समूहाच्या या कंपनीत २.१ एक लाख महिला कर्मचारी आहेत. एकूण मनुष्यबळाच्या तुलनेत हे प्रमाण ३५ टक्के आहे.
2 / 15
टक्केवारीच्या तुलनेत विचार केला असता, पेज इंडस्ट्रीजने महिलांना सर्वाधिक नोकऱ्या दिल्या आहेत. मात्र, टाटांच्या टीसीएसची आकडेवाडी संख्येने मोठी आहे. पेज इंडस्ट्रीजने २२ हजार ६३१ महिलांना नोकरी दिली आहे,
3 / 15
हुरून इंडियाच्या अहवालातून माहिती आली समोर आली आहे, कोणत्या कंपनीने किती महिलांना नोकरी दिली, ते टक्केवारीत आणि आकडेवारीत पाहुयात
4 / 15
२२,६३१ पेज इंडस्ट्रीज I ७४% महिलांना नोकरी
5 / 15
२२,७५० एचडीएफसी बँक १६%
6 / 15
३२,६९७ आयसीआयसीआय बँक I ३१%
7 / 15
२,१०,००० टीसीएस I ३५%
8 / 15
४२,७७४ टेक महिंद्र I ३४%
9 / 15
५२,५०१ मदरसन सुमी सिस्टीम्स I ४१%
10 / 15
६२,५६० रिलायन्स इंडस्ट्रीज I १८%
11 / 15
१,२४,४९८ इन्फाेसिस I ४०%
12 / 15
८८,९४६ विप्रो I ३६%
13 / 15
६२,७८० एचसीएल I २८%
14 / 15
आयटी क्षेत्राने दिले महिलांना सर्वाधिक नाेकऱ्या हुरून इंडियाने सर्वाधिक महिला कर्मचारी असलेल्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. टीसीएसनंतर इन्फाेसिस, विप्राे, एचसीएल टेक्नाॅलाॅजिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा क्रमांक लागताे. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्राने महिलांना सर्वाधिक नाेकऱ्या दिल्या आहेत.
15 / 15
महिला कर्मचाऱ्यांच्या प्रमाणाचा विचार केल्यास पेज इंडस्ट्रीजमध्ये सर्वाधिक ७४ टक्के महिला कामावर आहेत. त्यानंतर मदरसन सुमी सिस्टीम्समध्ये ४१ टक्के महिला कर्मचारी आहेत.
टॅग्स :TataटाटाjobनोकरीWomenमहिला