सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 10:58 IST
1 / 6गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सुरू असलेल्या जोरदार वाढीला आता ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सोने खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.2 / 6मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या चार दिवसांत, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १९०० रुपयांपेक्षा जास्त घसरली. ८ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर १,०१,७९८ प्रति १० ग्रॅम होता. तो शुक्रवारी घसरून ९९,८५० प्रति १० ग्रॅम झाला आहे.3 / 6फ्युचर्स मार्केटसोबतच देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घट झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार ८ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,०१,४०६ प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर किंमत कमी होत गेली आणि शुक्रवारी ती १,००,०२३ प्रति १० ग्रॅम झाली.4 / 6म्हणजेच, एका आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९१९ ने घसरला आहे. तरीही, सध्या देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत १ लाख च्या वरच आहे.5 / 6१८ ऑगस्टच्या दरांनुसार, विविध कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट : १,००,०२३, २२ कॅरेट : ९७,६२० रुपये, २० कॅरेट : ८९,०२० रुपये, १८ कॅरेट : ८१,०२० रुपये, १४ कॅरेट : ६४,५१० रुपये आहे.6 / 6हे दर देशभरात सारखेच असले तरी, दागिने खरेदी करताना त्यावर ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात किंमत थोडी जास्त असू शकते.