शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate: बापरे! पुढील वर्षात सोने 63000 वर; जाणून घ्या MCX वरील अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 6:04 PM

1 / 10
सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये रोजच चढउतार सुरु आहेत. ऑगस्टपेक्षा सोने 6-7 हजारांनी खाली आलेले असले तरीही सध्या विश्लेशकच संभ्रमात पडल्याचे दिसत आहेत.
2 / 10
महिनाभरापूर्वी सोन्याचे दर नवीन वर्षात 42000 वर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. आता काही तज्ज्ञांनी येत्या वर्षात सोने थोडे थोडके नव्हे तर 63000 वर जाण्याची शक्यता वर्तविली आहे.
3 / 10
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात किंचित घट (Gold Price Fall) झाली. प्रतितोळा सोने 16 रुपयांनी घसरून 49,484 रुपये प्रतितोळे झाले. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे.
4 / 10
मंगळवारी सोने 49,500 प्रति तोळ्यावर बंद झाले होते. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ (Silver Price Rise) दिसून आली आहे. चांदी 205 रुपयांनी वाढून 67,673 रुपये प्रति किलो झाली आहे. मंगळवारी चांदी 67,468 रुपये प्रति किलो होती.
5 / 10
आता पुढील वर्षातील सोन्याच्या किंमतीचे अंदाज लावण्यास तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. या वर्षी सोन्य़ाच्या दराने 56000 चा टप्पा ओलांडला होता. सध्या सोने 50000 रुपयांच्या आसपासच गेल्या महिनाभरापासून घुटमळत आहे.
6 / 10
यामुळे पुढील वर्षात (Gold Price in new year) देखील सोने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोने आधीचे ऑगस्टमधील रेकॉर्डतोडून 63000 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
7 / 10
HDFC सिक्योरिटीजच्या वरिष्ठ विश्लेशक तपन पटेल यांनी सांगितले की, सोन्याच्या दरात पुढील वर्षी चांगली वाढ दिसू शकते. जागतिक स्तरावरील रिकव्हरीची चिंता पाहता 2021 मध्ये सोन्याचे कॉमेक्सवरील लक्ष्य हे 2,150 डॉलर आणि 2,390 डॉलर प्रति औंस ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे एमसीएक्सवर सोन्याचे लक्ष्य 57 हजार ते 63 हजार रुपये प्रति १० ग्रॅम ठेवण्यात आले आहे. याचे वृत्त एनबीटीने दिले आहे.
8 / 10
2020 मध्ये सोन्याच्या दरात 28 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सोने 56379 रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली.
9 / 10
कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली.
10 / 10
नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ३० ऑक्टोबरला सोन्याचा दर 50699 रुपये प्रति १० ग्रॅम होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून 52167 रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला 48106 रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. डिसेंबरमध्येही सो्न्याच्या दरात काहीशी वाढ दिसली आहे.
टॅग्स :GoldसोनंGold Spot Exchangeगोल्ड स्पॉट एक्स्चेंजcorona virusकोरोना वायरस बातम्या