पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:07 IST
1 / 8कोटक सिक्युरिटीजच्या एका नवीन अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या तेजीमुळे सोन्याचा दर २०२६ पर्यंत ५,००० डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो. यासोबतच, भारतीय बाजारात सोन्याची किंमत १.५ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.2 / 8अमेरिकेतील श्रम बाजार कमकुवत होणे आणि आर्थिक वाढ मंदावल्यामुळे फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षीही व्याजदरात कपात सुरू ठेवण्याची शक्यता आहे. कमी व्याजदरांमुळे सोन्यासारखी 'नॉन-यील्डिंग' मालमत्ता अधिक आकर्षक बनते.3 / 8अमेरिकन डॉलरचे मूल्य कमी होण्याचा धोका वाढल्यामुळे जगभरातील सेंट्रल बँका आपल्या परकीय गंगाजळीत सोन्याचा वाटा वाढवत आहेत. यामुळे सोन्याच्या मागणीत भर पडणार आहे.4 / 8केवळ विकसित देशच नाही, तर उदयोन्मुख बाजारपेठेतील सेंट्रल बँकाही हीच रणनीती (सोन्यात गुंतवणूक वाढवणे) अवलंबत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या दरात तेजीचा अंदाज अधिक मजबूत होत आहे.5 / 8जगभरातील वाढता भू-राजकीय तणाव, युद्धाची परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सोने हे सर्वात विश्वसनीय 'सेफ-हेवन ॲसेट' बनले आहे.6 / 8२०२५ मध्ये सोन्याने ५० हून अधिक वेळा नवीन सर्वकालीन उच्चांक बनवला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ४,३८० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले. एवढी मोठी वाढ होऊनही सोन्याचा दीर्घकालीन ट्रेंड मजबूत आहे.7 / 8गेल्या वर्षभरात भारतात सोने ६० टक्क्यांहून अधिक वाढले आहे आणि १,३२,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रम मोडला आहे. रुपयाच्या कमजोर स्थितीमुळे भारतीय बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा अधिक वेगाने वाढ झाली आहे.8 / 8तज्ज्ञांचे मत आहे की, २०२५ मधील तेजीनंतर थोडी स्थिरता येऊ शकते, पण मोठे घटक (जसे की दर कपात, डॉलरची कमजोरी) २०२६ मध्येही सोन्याचे दर वरच्या दिशेने घेऊन जातील. सोने आता दीर्घकाळासाठी 'हायर-फॉर-लॉन्गर' झोनमध्ये दाखल झाले आहे.