शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात सोने खरेदी जोरात, मागणीत 43 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:16 AM

1 / 10
सोन्यावरील भारतीयांचे प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत ४३ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
2 / 10
शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवली असल्याचे नव्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
3 / 10
जागतिक सुवर्ण परिषदे (डब्ल्यूजीसी) च्या नव्या अहवालानुसार, भारतात एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये सोन्याची मागणी वार्षिक आधारावर ४३ टक्क्यांपेक्षा अधिक राहिली आहे. असे असले तरी वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेत घरंगळत चाललेला रुपया आणि सरकारी धोरणे यांचा फटका सोने खरेदीवर होण्याची शक्यता आहे.
4 / 10
आजचा दर काय? गुरुवारी सोने ४४० रुपयांच्या वाढीसह ५१,१६० रुपयांवर पोहोचले,तर चांदीच्या किमतीत १,५९६ रुपयांची वाढ होत ती ५६,४४० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
5 / 10
सोन्याचा पुनर्वापर वाढला भारतात सोन्याचा पुनर्वापर १८ टक्क्यांनी वाढून २३.३ टनांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तो १९.७ टन होता. सोन्याची आयातदेखील ३४ टक्क्यांनी वाढून १७० टनांवर पोहोचली आहे. २०२१ मध्ये ही आयात १३१.६ टनांवर होती.
6 / 10
संधी आणि धोकाही २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये सोन्यातील गुंतवणूक ही संधी आणि मोठा धोकाही आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी मागणी वाढत असून, आक्रमक धोरणे आणि डॉलर भक्कम झाल्याने मोठे आव्हानही निर्माण झाले आह
7 / 10
जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, अक्षय तृतीयेला विवाहाच्या तिथी सुरू झाल्याने दागिन्यांची मागणी ४९ टक्क्यांनी वाढून १४०.३ टन झाली आहे. लोक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे सोने खरेदीकडे वळले आहेत.
8 / 10
सरकारचे निर्बंध बासनात सोने खरेदीमुळे देशाच्या वित्तीय तुटीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आयात प्रचंड वाढली असून, निर्यात मात्र घटली आहे. त्यामुळे सोने खरेदीवर आता अधिकचे शुल्क आकारण्यात येत आहे. असे असतानाही सोन्याची मागणी देशात वाढत असून, गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे.
9 / 10
८% टक्क्यांनी सोन्याची मागणी जागतिक स्तरावर कमी झाली असून. ती ९४८.४ टनांवर आली आहे. ₹७९,२७० कोटी सोने खरेदी जून तिमाहीत (२०२२) मध्ये भारतीयांनी केली.
10 / 10
₹५१,५४० कोटी सोने खरेदी २०२१ च्या जून तिमाहीत करण्यात आली होती.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसायIndiaभारत