By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:43 IST
1 / 8आज बाजार उघडताच मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात ४% तर चांदीच्या दरात तब्बल ८% ची वाढ नोंदवण्यात आली. यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.2 / 8या तेजीनंतर सोन्याचा भाव १,४८,५५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीने पुन्हा २,५०,४३६ रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.3 / 8जागतिक बाजारपेठेतही सोन्याने ४,५०० डॉलरची पातळी ओलांडून ४,८३१.४० डॉलर प्रति औंसवर झेप घेतली आहे. चांदी देखील ८३.०१० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.4 / 8राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्के केल्याने बाजारातील भीतीचे सावट कमी झाले. यामुळे सोन्यातील घसरणीला तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे.5 / 8लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, २९ जानेवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीने आपला सर्वोच्च ऐतिहासिक स्तर गाठला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत यात मोठी पडझड पाहायला मिळाली होती.6 / 8जरी मूळ टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले असले, तरी अमेरिकेने अद्याप २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ पेनल्टी कायम ठेवली आहे. ही बाब गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर टाकत आहे.7 / 8ट्रेड डीलमुळे मार्केटमधील 'अनिश्चितता' संपली असे वाटत असले, तरी धोरणात्मक बदलांमुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून पैसा काढून शेअर बाजाराकडे वळवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा घसरू शकतात.8 / 8तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील ही आजची तेजी केवळ तांत्रिक सुधारणा असू शकते. अमेरिकेच्या व्यापार धोरणांमधील स्पष्टता जसजशी वाढेल, तसतसे सोन्याचे दर पुन्हा एकदा खालच्या पातळीवर येण्याची दाट शक्यता आहे.