शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:40 IST

1 / 8
शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण दिसत आहे. टाटा कॅपिटल (Tata Capital) पासून ते एलजी (LG) पर्यंत अनेक कंपन्यांच्या आयपीओमुळे बाजारात उत्साह आहे. मात्र, मंगळवारी बाजारात पदार्पण केलेल्या ग्लोटिस (Glotis) कंपनीच्या शेअर लिस्टिंगने गुंतवणूकदारांना जबरदस्त झटका दिला आहे. त्यांच्यावर अक्षरशः डोके झोडून घेण्याची वेळ आणली आहे. त्यांचे मोठे नुकसान केले आहे.
2 / 8
35% डिस्काउंटवर लिस्टिंग - ग्लोटिस आयपीओ (IPO) साठी 120-129 रुपये प्रति शेअरचा प्राईस बँड निश्चित करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी जेव्हा हे शेअर बाजारात लिस्ट झाले, तेव्हा त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली.
3 / 8
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर हा शेअर आपल्या इश्यू प्राईस (Issue Price) 129 रुपयांच्या तुलनेत 35% डिस्काउंटसह केवळ 84 रुपयांवर लिस्ट झाला. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर तो 32% डिस्काउंटसह 88 रुपयांवर लिस्ट झाला.
4 / 8
अर्थात लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे प्रति शेअर 45 रुपये एवढे जबरदस्त नुकसान झाले आहे.
5 / 8
एका लॉटवर 5,000 रुपयांहून अधिकचा घाटा - ग्लोटिस शेअर्सवर बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना झालेल्या घाट्याचा विचार करता, कंपनीने आयपीओ लॉन्च करताना 114 शेअर्सचा लॉट निश्चित केला होता. अप्पर प्राइस बँडनुसार, कुठल्याही गुंतवणूकदाराला किमान 14,706 रुपयांची गुंतवणूक करायची होती.
6 / 8
हा आयपीओ आता 35% डिस्काउंटसह लिस्ट झाला आहे. अर्थात या गुंतवणूकदारांना जवळपास थेट 5,130 रुपयांचा घाटा झाला आहे. यानंतर, त्यांच्या गुंतवणूक 9,576 रुपयांवर आली आहे.
7 / 8
गुंतवणूकदारांचा थंड प्रतिसाद - चेन्नईस्थित ग्लोटिस (Glotis) कंपनीने ₹३०७ कोटी (अंदाजे $१.०७ अब्ज) किमतीचा IPO आणला होता आणि २३,७९८,७४० शेअर्ससाठी बोली मागवण्यात आली होती. यात १२,४०३,१०० एवढे नवे शेअर्स होते. यांचे मूल्य ₹१६० कोटी (अंदाजे $१.६० अब्ज) होते...
8 / 8
...तर ११,३९५,६४० शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विक्रीसाठी आणण्यात आले होते, यांचे मूल्य ₹१४७ कोटी (अंदाजे $१.४७ अब्ज) होते. या इश्यूला गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला, हा एकूण ३.०५ पट सबस्क्राइब झाला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स QIB श्रेणीने (१.८७ पट), NII श्रेणी (२.९७%) आणि रिटेल श्रेणी (१.४२%) सब्स्क्राइब झाली.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगMONEYपैसाStock Marketस्टॉक मार्केट