गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरली, जाणून घ्या लग्नाबद्दलची सर्व माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:37 IST
1 / 5अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांचे चिरंजीव जीत अदानी यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. गौतम अदानी यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने हा विवाह होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.2 / 5जीत अदानी यांचा विवाह दिवा जैमिन शाह यांच्याशी होत आहे. त्यांचा साखरपुडा १२ मार्च २०२३ रोजी झाला होता. त्यांच्या लग्नाचीही तारीखही आता समोर आली आहे. गौतम अदानी हे पत्नी आणि मुलासह महाकुंभमेळ्यात सहभागी झाले. पवित्र स्नान, पूजा-आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जीत अदानी यांच्या लग्नाबद्दलची माहिती दिली.3 / 5साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. आम्ही सामान्य माणसांसारखेच आहोत. जीतचे लग्न पारंपरिक पद्धतीने होईल. जीत यांचे लग्न सेलिब्रेटींचा महाकुंभ असेल का? या प्रश्नाला उत्तर देताना अदानी म्हणाले की, 'अजिबात नाही.'4 / 5जीत अदानी यांचे लग्न ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. ५ फेब्रुवारीपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात होईल. जीत आणि दिवा यांचे लग्न अहमदाबादमध्ये होणार आहे. 5 / 5या लग्नाला ३०० पेक्षा अधिक लोक नसतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण, याला अधिकृत दुजोरा दिला गेलेला नाही. गौतम अदानी यांनी सेलिब्रेटींची गर्दी नसेल असे सांगितले असले, तरी वेगवेगळे सेलिब्रेटी या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे.