शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gautam Adani यांच्या कंपनीनं केली डीलची घोषणा; एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:06 IST

1 / 8
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) मधील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळाला आहे.
2 / 8
मंगळवारी अदानी पोर्ट्सनं सांगितलं की, आंध्र प्रदेश सरकारकडून गंगावरम पोर्ट लिमिटेड (जीपीएल) मधील 10.4 टक्के भाग खरेदी करण्यासाठी त्याला मंजुरी मिळाली आहे.
3 / 8
या कराराचे मूल्य 644.78 कोटी रुपये आहे आणि 1 महिन्याच्या आत व्यवहार पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर, अदानी समूहाची जीपीएलमध्ये पूर्ण 100 टक्के भागीदारी असेल. जीपीएल आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात विशाखापट्टणम बंदराजवळ आहे.
4 / 8
या वृत्तादरम्यान दरम्यान, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) च्या गुंतवणूकदारांना उत्तम नफा मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत दोन टक्क्यांनी वाढून 710 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती.
5 / 8
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला आहे. कंपनीच्या बाजार भांडवलाबद्दल बोलायचं झालं तर ते 1 लाख 45 हजार कोटी रुपये झालं.
6 / 8
एप्रिल महिन्यात भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गंगावरम पोर्ट लिमिटेडमध्ये अदानी पोर्ट्सचे 89.6 टक्के भाग खरेदी करण्यास मान्यता दिली होती.
7 / 8
यापूर्वी, मार्चमध्ये, कंपनीने घोषणा केली होती की ती डीपीएस राजू आणि कुटुंबाकडून गंगावरम बंदरातील (जीपीएल) कंट्रोलिंग भागभांडवल 3,604 कोटी रुपयांना खरेदी करेल. यामुळे जीपीएलमधील तिचा हिस्सा वाढून 89.6 टक्के झाला.
8 / 8
अदानी पोर्ट्सने डीबीएस राजू आणि जीपीएलमधील कुटुंबाचा 58.1 टक्के हिस्सा वगळता वॉरबर्ग पिन्कसचा 31.5 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. एकूणच, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) चा GPL मध्ये 89.6 टक्के हिस्सा झाला होता.
टॅग्स :AdaniअदानीInvestmentगुंतवणूकMONEYपैसाshare marketशेअर बाजार