शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोफत मिळतंय Netflix आणि Amazon Prime Video, 'हा' आहे Jio चा पैसा वसूल प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:35 PM

1 / 6
सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स आणले जात आहेत. काळातनुसार आता अनेक युझर्स ओटीटी प्लॅटफॉर्मकडेही वळले आहेत. त्यामुळे अनेक दूरसंचार कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शनही देत आहेत.
2 / 6
तुम्ही OTT प्रेमी देखील आहात आणि तुम्हाला Amazon Prime Video आणि Netflix पाहणं देखील आवडत असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपलीये. आज आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओचा सबस्क्रिप्शन न घेता कसा फायदा घेऊ शकता ते सांगणार आहोत. जिओचा एक स्वस्त प्लान आहे जो या दोन्ही OTT ॲप्सचं बेनिफिट मिळतं.
3 / 6
399 रुपयांच्या या रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना 75 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे.
4 / 6
75 जीबी हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी शुल्क आकारले जाईल. या जिओ प्लानची एक खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 जीबी डेटा रोलओव्हर सुविधेचा लाभ दिला जाईल.
5 / 6
399 रुपयांचा हा पॅक रिलायन्स जिओचा पोस्टपेड प्लॅन आहे, ज्याची वैधता एका बिल सायकल इतकी आहे. या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांबद्दल आपण अधिक माहिती घेऊ.
6 / 6
399 रुपयांच्या या जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाइल प्लॅन, जिओ टीव्ही, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्युरिटीचा लाभ दिला जाईल. या प्लॅनसह Amazon Prime Video चे सब्सक्रिप्शन 1 वर्षासाठी दिले जात आहे.जर तुमचा फोन 5G असेल तर तुम्ही या प्लॅनसह 5G डेटाचा आनंद घेऊ शकाल.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओbusinessव्यवसाय