शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटा समुहाच्या ‘या’ शेअरवर विदेश गुंतवणूकदार फिदा; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, १००० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:41 IST

1 / 6
Tata Group Share Price : टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सच्या शेअनंर्स आज रॉकेट स्पीड पकडला आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्स १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले. टाटा केमिकल्सचे शेअर्स बीएसईवर १३.५ टक्क्यांनी वाढून १०७८.९५ रुपयांवर पोहोचले. कामकाजादरम्यान या शेअरने १,०८६.५५ रुपयांचा उच्चांक गाठला, जो त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा फक्त ६.५ टक्क्यांनी कमी आहे.
2 / 6
वास्तविक, कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ जूनच्या तिमाहीच्या निकालानंतर दिसून येत आहे. जून २०२२ ला संपलेल्या तिमाहीत टाटा समूहाच्या या कंपनीचा निव्वळ नफा ८६.२५ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी टाटा केमिकल्समध्ये विदेशी गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांचे व्याजही वाढले आहे. जून तिमाहीत त्यांनी कंपनीतील हिस्सा वाढवला आहे.
3 / 6
जूनमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टाटा केमिकल्सचा निव्वळ नफा ८६.२५ टक्क्यांनी वाढून ६३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने मंगळवारी शेअर बाजारालेल्या दिलेल्या माहितीतून हे समोर आले आहे. टाटा केमिकल्सने मागील आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) याच तिमाहीत ३४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न ३४.१५ टक्क्यांनी वाढून ३,९९५ कोटी रुपये झाले आहे जे मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत २,९७८ कोटी रुपये होते.
4 / 6
जून तिमाहीत, FII ने कंपनीतील त्यांचा हिस्सा १४.९९ टक्क्यांपर्यंत वाढवला. आधीच्या तिमाहीत तो १३.६२ टक्के होता. त्याच वेळी, म्युच्युअल फंडांनी मिळून हिस्सा ७.३६ टक्क्यांवरून ७.५८ टक्क्यांपर्यंत वाढवला.
5 / 6
लार्ज कॅप स्टॉक्स एका वर्षात २५ टक्क्यांनी वाढले आहेत आणि यावर्षी १६ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी हे शेअर्स गेल्या एका महिन्यात २५.८४ टक्क्यांनी आणि गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये १२.२३ टक्क्यांनी वाढला आहे. फर्मचे मार्केट कॅप वाढून २६,२७० कोटी रुपये झाले.
6 / 6
टाटा केमिकल्स लिमिटेड ही ग्लास, डिटर्जंट, औद्योगिक आणि रासायनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीची रॅलिस इंडिया लिमिटेड या उपकंपनीद्वारे पीक संरक्षण व्यवसायात मजबूत स्थान आहे. टाटा केमिकल्सकडे पुणे आणि बंगळुरू येथे जागतिक दर्जाच्या आर अँड डी सुविधा आहेत. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक