Zomato is now Eternal : २० मार्चपासून Zomato ला मिळाली नवी ओळख; मूळ नाव बदलण्यासाठी मंत्रालयाकडूनही मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:36 IST
1 / 5फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. कंपनीच्या नावात बदल झाला आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने झोमॅटोला नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. आता कंपनीचे नाव Zomato ऐवजी Eternal Limited असेल.2 / 5कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी सांगितले की, कंपनीचे नाव बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे. २० मार्च २०२५ पासून कंपनीचे नाव बदलले आहे. झोमॅटोने नियामक फाइलिंगमध्ये कंपनीचे नाव २० मार्च २०२५ पासून “Eternal Limited” केले असल्याची माहिती दिली आहे.3 / 5गेल्या महिन्यात झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी सांगितले होते की, आमच्या बोर्डाने या बदलाला मान्यता दिली असून मी आमच्या भागधारकांनाही या बदलाला पाठिंबा देण्याची विनंती करतो. ती मंजूर झाल्यास आमची कॉर्पोरेट वेबसाइट zomato.com वरून eternal.com अशी बदलेल. 4 / 5कंपनी दुसऱ्यांदा स्वत:चे रीब्रँडिंग करत आहे. २००८ मध्ये फूडबे म्हणून कंपनीची स्थापना झाली होती. २०१० मध्ये त्याचे नाव झोमॅटो करण्यात आले.5 / 5झोमॅटोने आपल्या कंपनी ब्लिंकिटचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. दीपंदर गोयल यांनी सांगितले होते की, जेव्हा आम्ही ब्लिंकिट हे नवीन उत्पादन म्हणून सुरू केले तेव्हा कंपनीच्या माध्यमातून त्याची जाहिरात करण्यात आली. झोमॅटो सारखी कंपनी बनल्यावर तिचे नाव बदलू असे आमच्या मनात होते. ब्लिंकिटने ती जागा घेतल्याचे आम्हाला वाटते. ब्लिंकिटचा व्यवसाय वाढावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, फूड डिलिव्हर करणाऱ्या झोमॅटोच्या नावात कुठलाही बदल होणार नाही.