तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:22 IST
1 / 7पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक कार, बाईक तसेच रिक्षाही बाजारात उपलब्ध आहेत.2 / 7केंद्र तसेच राज्यातील सरकारांनाही सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवला आहे. भारतात सध्याच्या घडीला टाटा मोटर्सच्या सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस रस्त्यांवर धावत आहेत. बाजारात या कंपनीचा वाटा सर्वाधिक आहे.3 / 7रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस सर्वाधिक टाटा मोटर्सच्या आहेत. टाटा मोटर्सचा बाजारातील हिस्सा ४८ टक्के इतका आहे. 4 / 7टाटा मोटर्सनंतर दुसरी कंपनी आहे जेबीएम ऑटो. जेबीएम ऑटोची बाजारातील हिस्सा १४.१६ टक्के आहे.5 / 7ऑलेक्ट्रा ग्रीन टच या कंपनीचा बाजारातील हिस्सा १४.०८ टक्के आहे. 6 / 7पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी या कंपनीचा इलेक्ट्रिक बसमधील हिस्सेदारी १०.३० टक्के आहे.7 / 7इतर कंपन्यांची बाजारातील हिस्सेदारी ८.०१ टक्के इतकी असून, मित्राह मोबिलिटी या कंपनीचा हिस्सा ५.४५ टक्के आहे.