शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घाईगडबड बिलकूल करु नका! ITR फाईल करताना ‘या’ चुका टाळा; अन्यथा मेहनत जाईल वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 9:51 AM

1 / 9
लोकमत न्यूज नेटवर्क : प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची ३१ जुलै ही अंतिम तारीख जवळ येत आहे. अनेकजण आयटीआर दाखल करण्यास उशीर करतात. नंतर घाईगडबडीत चुका करतात.
2 / 9
त्यासाठी करदात्यांनी आयटीआर वेळेत आणि चुका टाळून दाखल करायला हवे. कोणत्या चुका टाळायला हव्यात, याची ही माहिती...
3 / 9
आयटीआर फॉर्म - आयटीआर भरताना कोणता फॉर्म वापरायचा हे उत्पन्नाचे स्वरूप आणि करदात्याची श्रेणी यानुसार ठरते. करदात्याने त्याला लागू असलेला फॉर्मच निवडणे बंधनकारक आहे. चुकीचा फॉर्म वापरल्यास आयटीआर अग्राह्य धरला जाईल आणि तुम्हाला विभागाकडून डिफेक्ट नोटीस येईल. ही चूक विहित मुदतीत दुरुस्त करावी लागते.
4 / 9
व्यक्तिगत माहिती व बँक तपशील - २०२१-२२ चे आयटीआर फाइलिंग जेएसओएन युटिलिटीवर आधारित आहे. त्यात वैयक्तिक तपशील टॅक्स पोर्टलच्या आयटीआर फॉर्ममधून स्वयंचलित पद्धतीने येतो. करदात्याने टॅक्स पोर्टलमध्ये पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी अचूक भरावा. बँक अकाउंटचा तपशीलही बिनचूक असावा; अन्यथा तुम्हाला रिफंड क्रेडिटमध्ये समस्या येतील.
5 / 9
२६एएस, फॉर्म एआयएस यांची जुळणी - उत्पन्नाची योग्य माहिती दाखल होण्यात पारदर्शकता आणण्यास सरकारने वार्षिक माहिती निवेदन (एआयएस) फॉर्म सादर केला आहे. करदात्यांना फॉर्म एआयएस व फॉर्म २६एएस यांना अनुरूप आयटीआर भरायचे असते. दोन्हींतील आकडेवारीत तफावत येता कामा नये.
6 / 9
उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती - बचत खात्यांतील व्याज, मुदत ठेवींवरील व्याज, घराचे भाडे, इत्यादी सर्व स्रोतांच्या उत्पन्नाची माहिती आयटीआरमध्ये देणे आवश्यक आहे. उत्पन्न लपविल्यास करदाता अडचणीत येऊ शकतो.
7 / 9
सूट असलेल्या उत्पन्नाची माहिती देणे - पीपीएफवरील व्याजाचे उत्पन्न, सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज, नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटी, इत्यादींवर प्राप्तिकर लागत नाही. मात्र, यांची माहिती आयटीआरमध्ये देणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला यावर सूट मिळू शकणार नाही.
8 / 9
आयटीआर-व्ही पडताळणी - आयटीआर भरल्यानंतर ई-पडताळणी करावी लागते. सीपीसीला मॅन्युअल स्वरूपात हस्ताक्षर केलेली आयटीआर-व्ही प्रत पाठवावी लागते. आयटीआर-व्ही पडताळणी केली नाही, तर मेहनत फुकट जाते.
9 / 9
फॉरिन टॅक्स क्रेडिट क्लेमसाठी फॉर्म ६७ आवश्यक - विदेशातील प्राप्तिकराचे क्रेडिट क्लेम करावयाचे असल्यास आयटीआर दाखल करण्यापूर्वी फॉर्म ६७ भरणे आवश्यक आहे. याशिवाय विदेशात अदा केलेल्या करांचे पुरावे जोडणेही आवश्यक आहे.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Slabआयकर मर्यादा