शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डिजिटल उद्योजक... असा बनवा तुमचा स्वत:चा QR कोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 2:30 PM

1 / 8
भारतात गेल्या काही वर्षात डिजिटल पेमेटनं धुमाकूळ घातला आहे. लहान मोठ्या व्यवहारापासून ते कोट्यवधींचे आर्थिक व्यवहारही डिजिटल पद्धतीने होत आहेत.
2 / 8
कोरोना कालावधीत डिजिटल पेमेंटने आणखी उचल खाल्ल्याचे दिसून आले. अगदी पाणीपुरी, भेळवाल्यापासून ते चहा पानाच्या ठेल्यावरही तुम्हाला फोन पे, पेटीएमने व्यवहार सुकर झाला.
3 / 8
क्यूआर कोडद्वारेही अनेक लहान-सहान दुकानात व्यवहार करायला येऊ लागले, पैशांची देवाण घेवाणही अतिशय सहज आणि सुलभ झाली आहे
4 / 8
सरकारनेही डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत भीम अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार सुरू केले आहेत. स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे, रिसिव्ह करणे सोपे झाले आहे.
5 / 8
क्यूआर कोडमुळे पेमेंट करणे सुरक्षित मानले जाते. तुम्ही स्वतः देखील तुमचा स्वत:चा क्यूआर कोड तयार करू शकता. तुम्ही जर दुकानदार असाल, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
6 / 8
सर्वात आधी क्यूआर कोड काय आहे व कसे काम करते, हे जाणून घ्या. याचा फुल फॉर्म क्विक रिस्पांस कोड असा आहे. खास माहितीला सांकेतिक शब्दांमध्ये बदलण्यासाठी याचा वापर केला जातो.
7 / 8
तुम्ही जर दुकानदार असल्यास क्यूआर कोड जनरेट करण्यासाठी तुमचे बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. हे खाते भीम अ‍ॅपशी लिंक करून तुमचा यूनिक भारत क्यूआर कोड जनरेट करू शकता. त्यानंतर तो क्यूआर कोड प्रिंट करून तुम्ही दुकानात कोठेही लावू शकता.
8 / 8
तुम्ही ग्राहक असल्यास क्यूआर कोडच्या मदतीने पेमेंट करण्यासाठी फोनमध्ये बँक अ‍ॅप अथवा भीम अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल. तुम्ही अ‍ॅपद्वारे कोणत्याही दुकानदाराचा क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. इतरही लोक तुमच्या फोनमधील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे पाठवू शकतील.
टॅग्स :onlineऑनलाइनdigitalडिजिटलPaytmपे-टीएम