फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:39 IST
1 / 9महिला आणि पुरुषांसाठी कंडोम तयार करणाऱ्या क्यूपिड लिमिटेड, या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर गुरुवारी विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. एनएसईवरील इंट्राडे व्यवहारात कंपनीचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारून ₹२८९ वर पोहोचला. सप्टेंबर तिमाहीतील मजबूत निकालांनंतर, या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. 2 / 9गेल्या पाच व्यवहार सत्रांत हा शेअर सुमारे १७ टक्क्यांची वधारला आहे. महत्वचाे म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांतच य शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर २३५ टक्क्यांनी वाढवला आहे. गेल्या तीन वर्षांत क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये तब्बल २३०० टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे.3 / 9१४० टक्क्यांनी वाढला कंपनीचा तिमाही नफा - कंपनीच्या सप्टेंबर २०२५ तिमाहीतील नफ्यात १४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीत क्यूपिड लिमिटेडला ₹२४.१२ कोटींचा एकत्रित नफा झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ₹१०.०४ कोटी होता. 4 / 9कंपनीचे उत्पन्नही वार्षिक आधारावर १०३.२२ टक्क्यांनी वाढून ₹८४.४४ कोटी झाले आहे. करपूर्व नफा ₹३२.१८ कोटींवर पोहोचला असून, मागील वर्षी तो ₹१४.२० कोटी होता.5 / 9३ वर्षांत दिला २३००% हून अधिक परतावा - क्यूपिड लिमिटेडच्या (Cupid Limited) शेअरने गेल्या तीन वर्षांत 2330 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. हा शेअर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी ₹११.८१ वर होता. तो १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ₹२८९ वर पोहोचला. गेल्या दोन वर्षांत या शेअरमध्ये ६०३ टक्क्यांची, 6 / 9गेल्या एका वर्षात या शेअरने २४२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. सध्या या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२८९, तर नीचांक ₹५५.७५ एवढा आहे.7 / 9दरम्यान, कंपनीने आपल्या भागधारकांना, ऑक्टोबर २०१८ मध्ये १:५ आणि एप्रिल २०२४ मध्ये १:१ या प्रमाणात, असे दोन वेळा बोनस शेअर दिले आहेत. तसेच एप्रिल २०२४ मध्ये कंपनीने आपल्या शेअर्सचे १० भागांत विभाजन केले होते.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)