By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:10 IST
1 / 6सध्याच्या आकडेवारीनुसार, बँक ऑफ इंडिया ७.१०% या दराने सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही गृहकर्जाच्या शोधात असाल, तर ही बँक तुमच्यासाठी टॉपवर असू शकते.2 / 6स्वस्त कर्जाच्या शर्यतीत कॅनरा बँक ७.१५% आणि पंजाब नॅशनल बँक ७.२०% व्याजासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.3 / 6देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया ७.२५% दराने कर्ज देत आहे. बँकांचे मोठे जाळे आणि सुरक्षा यामुळे अनेक ग्राहक थोडा दर जास्त असूनही एसबीआयलाच पसंती देतात. तर पंजाब अँड सिंध बँक ७.३०% व्याजदराने गृहकर्ज देत आहे.4 / 6सरकारी बँकांमधून कर्ज घेण्याचा मोठा फायदा म्हणजे 'हिडन चार्जेस' नसणे. येथे नियम स्पष्ट असतात आणि सणासुदीच्या काळात प्रोसेसिंग फीमध्येही सवलत मिळते.5 / 6बँकांनी जाहीर केलेले सर्वात कमी व्याजदर हे प्रामुख्याने ७५० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांसाठी असतात. तुमचा सिबिल स्कोर कमी असल्यास बँक व्याजाचा दर वाढवू शकते.6 / 6जेव्हा रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करते, तेव्हा त्याचे फायदे खाजगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँका ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवतात, ज्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होऊ शकतो.