शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

budget 2021 : अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात होणार हे बदल

By बाळकृष्ण परब | Published: February 02, 2021 5:41 AM

1 / 6
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाकाळातील कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत.
2 / 6
कोरोनाने आरोग्याच्या क्षेत्रात काळजी वाढविली असली तरी आगामी वर्षासाठी या क्षेत्रात सरकार ९४,४५२ कोटी खर्च करणार आहे, तर आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी २.२३ लाख कोटींचा प्रस्ताव आहे. एकूणच सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंदा बजेटमध्ये अधिक तरतूद केली आहे. चार नव्या विषाणू संस्था आणि मोबाइल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहेत. 
3 / 6
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला हॉटेल व्यवसायाचा समावेश आहे. मात्र, या क्षेत्रातील व्यवहारही आता पूर्वपदावर येत आहेत. हॉटेल व्यावसायिकांसाठी सवलतींची थेट घोषणा नसली तरी पर्यटनवाढीसाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पर्यटन मार्गावर नवे कोच सुरू करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा फायदा पर्यटनस्थळावरील या व्यावसायिकांना होणार आहे.
4 / 6
हरभरा, वाटाणे, मसूर, कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन, सूर्यफूल तेल यावर उपकर लावण्यात आल्याने किचनमधील फोडणीला महागाईची झळ बसणार आहे. साहजिकच त्यामुळे गृहिणींना किचनसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर किती स्थिर राहतात यावरच किचनमधील खर्चाचा ताळमेळ बसवताना त्यांची पुरती तारांबळ उडणार आहे. 
5 / 6
कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला. आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना या क्षेत्राला अपेक्षा असल्या तरी बजेटमध्ये विशेष तरतुदी नाहीत. गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे सरकारचे धोरण दिसते. लसीकरणानंतर साथ आणखी आटोक्यात आली तर भविष्यात या क्षेत्राला भरारी घेण्यासाठी सरकार मदतीचा हात पुढे करू शकते.
6 / 6
पेट्रोल आणि डिझेलवर उपकर लावला असला तरी त्याचा थेट फटका सामान्यांना बसणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा दररोजचा प्रवास सध्या तरी सुखकर होण्याची चिन्हे आहेत. शहरांतर्गत आणि बाहेरच्या प्रवासासाठी सध्या खिशाला जी झळ बसते, त्यात पेट्रोलच्या नियमित बदलणाऱ्या दरामुळे थोडाफार फरक पडू शकतो.
टॅग्स :budget 2021बजेट 2021IndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था