मोठी ऑफर! iPhone 14 Plus वर २३ हजारांची सूट; आजच या ठिकाणी वेबसाईटला भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 02:56 PM2022-11-23T14:56:11+5:302022-11-23T14:59:29+5:30

जर तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयफोन 14 प्लसवर २२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

जर तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयफोन 14 प्लसवर २२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. आयफोन 14 प्लस ऑक्टोंबरमध्ये लाँच झाला आहे. या मोबाईलची बॅटरी जास्तवेळ चालते. याची बॅटरी आयफोन 14 पेक्षा जास्तवेळ चालते.

आयफोन 14 च्या तुलनेत आयफोन 14 प्लस ची किंमत जास्त आहे. पण, आता या फोनवर मोठी ऑफर सुरू आहे.

या फोनवर तुम्हाला २२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या फोनची एमआरपी ९० हजार रुपयांपर्यंत आहे. पण या ऑफरमध्ये तुम्हाला ६८,६०० रुपयांपर्यंत मिळू शकतो.

अॅमेझॉनवर सध्या मोठी ऑफर सुरू आहे. आयफोन 14 प्लसवर मोठी ऑफर सुरू आहे. सध्या आयफोन 14 प्लस 128 GB स्टोअरेज फोनवर ही ऑफर सुरू आहे. या फोनची किंमत ८९,९०० रुपये आहे. पण, अॅमेझॉनवर तुम्हाला ८८,४०० रुपयांना मिळतो तर, एक्सचेंज आणि बँक ऑफरवरुन घेतला तर अजुन मोठी सूट मिळू शकते.

HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर ग्राहकांना ५००० रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्हाला १६,३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. पण, एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबून असेल.

एचडीएफसी बँकेच्या ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फोन फक्त ६७,१०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सध्या अधिकृत साइटवर iPhone 14 ची सुरुवातीची किंमत ७९,९०० रुपये आहे. म्हणजेच, तुम्हाला iPhone 14 पेक्षा कमी किमतीत मोठ्या डिस्प्लेसह आणि दीर्घ बॅटरी आयुष्यासह iPhone 14 Plus खरेदी करण्याची संधी आहे.