शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहणार बंद!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 11:41 AM

1 / 10
नवी दिल्ली : बँकांशी संबंधित 9 संघटनांची मुख्य संस्था (Umbrella Body) असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) 15 मार्च 2021 पासून देशभरातील सर्व बँकांचा संप पुकारला आहे.
2 / 10
ही बँकांची संघटना सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या (Privatization of PSBs) विरोधात आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करताना 2 सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती.
3 / 10
दोन्ही बँकांचे खाजगीकरण केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या (Disinvestment Plan) योजनेंतर्गत केले जाईल, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते.
4 / 10
केंद्र सरकारने 2019 मध्ये आयडीबीआय बँकेचे एलआयसीकडे विक्री करुन खाजगीकरण केले. याखेरीज मागील चार वर्षांत 14 सरकारी बँकांचे विलीनीकरणही करण्यात आले आहे.
5 / 10
मंगळवारी झालेल्या बैठकीत यूएफबीयूने निर्णय घेतला की बँकांच्या सर्व संघटना 15 मार्चपासून 2 दिवसाचा संप पुकारून खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करतील.
6 / 10
एलआयसी आणि जनरल इन्शुरन्स कंपनीने खाजगीकरण, इन्शुरन्स सेक्टरमध्ये 74 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीची मंजूरी यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी.एच. वेंकटचलम म्हणाले.
7 / 10
खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा कर्मचार्‍यांवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे त्यांना विरोध करणे आवश्यक आहे. यासाठी 15 आणि 16 मार्च रोजी बँकांकडून संप पुकारण्याची घोषणा करण्यात आल्याचे यूएफबीयूच्या बैठकीवरून समजते.
8 / 10
यूएफबीयूमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) यांचा समावेश आहे.
9 / 10
याचबरोबर, मुख्य संघटनेत आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीओ यांचा देखील समावेश आहे.
10 / 10
यूएफबीयूच्या निर्णयामुळे आता पुढील महिन्यात 15 आणि 16 हे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात 14 तारखेला रविवार आला असल्याने या दिवशी बँकेला अधिकृत सुट्टी असते.
टॅग्स :bankबँकStrikeसंपbusinessव्यवसाय