Airtel launches Amazon Prime Video Mobile Edition plans starting at Rupees 89
आता केवळ ८९ रुपयांमध्ये पाहता येणार Amazon Prime, 'या' कंपनीनं आणला नवा प्लॅन By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 3:19 PM1 / 10सध्या ग्राहकांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचं क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हेच अगदी आता दूरसंचार कंपन्यांनीही हेरलं आहे. एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष प्लॅन लाँच केला आहे. 2 / 10कंपनीचा हा प्लॅन ८९ रूपयांपासून सुरू होतो. एअरटेलनं यासाठी अॅमेझॉनसोबत करार केला आहे. हा केवळ मोबाईलच्या ग्राहकांसाठीच देण्यात आलेला प्लॅन आहे. 3 / 10एअरटेलचा हा प्लॅन सिंगल युझर मोबाईल ओनली प्लॅन आहे. या अंतर्गत एअरटेल युझरला एसडी क्लालिटीमध्ये Amazon Prime व्हिडीओ सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे. 4 / 10भारतात प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशन प्लॅन लाँच अंतर्गत बंडल्ड प्रिपेड प्लॅन्सवर एअरटेलच्या सर्व ग्राहकांना ३० दिवसांसाठी मोफत सेवा दिली जात आहे. 5 / 10ग्राहकांना Airtel Thanks app द्वारे आपलं अॅमेझॉन साईन अप करावं लागेल.6 / 10सध्या केवळ भारतातच Prime Video: Mobile Edition प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर आजपासूनच लागू होणार आहे. 7 / 10३० दिवसांच्या मोफत सेवेनंतर जर एअरटेलच्या ग्राहकांना हा प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर ग्राहकाला ८९ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. 8 / 10या मोबाईल एडिशन प्लॅनसोबत ग्राहकांना ६ जीबी डेटाही दिला जाणार आहे. तसंच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची सेवा २८ दिवसांकरिता वापरता येणार आहे. 9 / 10याव्यतिरिक्त कंपनी २९९ रूपयांचाही एक प्लॅन देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचा अॅक्सेसही मिळणार आहे. या प्लॅनदेखील २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.10 / 10यासह असलेली एक प्रमुख अट म्हणजे ग्राहकांना केवळ प्राईम व्हिडीओवरीलच कंटेंटचा लाभ घेता येणार आहे. त्या अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्सना मिळणारा लाभ मिळणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications