By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:08 IST
1 / 9अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा केली. दरम्यान, भारतावर लादण्यात आलेला टॅरिफ अथवा करही १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. या मोठ्या आणि महत्वपूर्ण घोषणेनंतर, भारतीय शेअर बाजारात लक्षणीय तेजीत दिसत आहे.2 / 9महत्वाचे म्हणजे, या व्यापार करारानंतर आज अदानी समूहाचे शेअर्सदेखील रॉकेड बनले आहेत. या करारामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. असा अंदाज जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने व्यक्त केले आहे.3 / 9अदानी ग्रीनचा शेअर १३% ने वधारला आहे. तर समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १०% ने वधारला आहे. याशिवाय, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्ट्स आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स ६% ते ८% ने वधारले आहेत.4 / 9या व्यापारी करारात अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. जेफरीजच्या मते, या निर्णयाचा सर्वाधिक पायदा अदानी समूहाच्या कंपन्यांना मिळेल. 5 / 9याशिवाय, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अँटिकनेही अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्सना अमेरिकेसोबतच्या कराराचा सर्वाधिक फायदा होणाऱ्या कंपन्यांमध्ये सूचीबद्ध केले आहे. गेल्या १६ महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ३४ अब्ज डॉलर्सचे भारतीय शेअर्स विकले आहेत.6 / 9कुणाला होणार फायदा? - यासंदर्भात जेफरीजचे विश्लेषक महेश नंदुरकर म्हणाले, ट्रेड डीलसंदर्भात गुंतवणूकदारांच्या मनातील चिंता आता दूर झाली आहे. अमेरिका ही भारतासाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. 7 / 9तसेच, या करारामुळे रिअल इस्टेट, टेलिकॉम, वाहतूक, वित्तीय सेवा आणि आरोग्यसेवा क्षेत्रांना मोठा फायदा होऊ शकतो. याच बरोबर, भांडवली वस्तू, वित्तीय सेवा, आयटी सेवा आणि वीज उपयुक्तता यांनाही फायदा होईल.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)