नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 09:21 IST
1 / 9Girls Investment Scheme: पालकांसाठी त्यांच्या मुलींचा सन्मान करण्यासोबतच त्यांचं भविष्य सुरक्षित करणंही महत्त्वाचं असते. सध्या देशात मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत, ज्या शिक्षण, विवाह आणि भविष्यातील बचतीला प्रोत्साहन देतात. या योजनांमध्ये उच्च परतावा (High Return), कर सवलत (Tax Exemption) आणि सुरक्षा मिळते.2 / 9२०२५ मध्ये महागाई (Inflation) ५-६% असल्यानं, शिक्षण आणि विवाहाचा खर्च लाखो रुपयांमध्ये असू शकतो, त्यामुळे लवकर गुंतवणूक सुरू करणं आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजनेसारख्या (SSY) सरकारी योजना मुलींसाठी सर्वोत्तम आहेत. या योजना ८-१०% परतावा देतात आणि करमुक्त आहेत. लाखो पालक या योजनांचा फायदा घेत आहेत.3 / 9ही एक जबरदस्त बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना ही 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेचा भाग असलेली मुलींसाठीची सरकारी बचत योजना आहे. कशी काम करते? १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावावर खातं उघडावं लागतं. किमान २५० रुपये वार्षिक, कमाल १.५ लाख रुपये आणि ही योजना २१ वर्षांपर्यंत चालते. यामध्ये सुमारे ८.२ टक्के व्याज दिलं जातं. तसंच यात चक्रवाढीनं व्याज गणलं जातं. लाभ: पूर्णपणे करमुक्त (EEE—उत्पन्न, गुंतवणूक, परिपक्वता), कलम ८०C अंतर्गत १.५ लाखांपर्यंत सूट. उदाहरण: १० वर्षांच्या मुलीसाठी दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवल्यास, २१ वर्षांनंतर सुमारे १ कोटी रुपये मिळू शकतात. तुम्ही पोस्टात किंवा बँकेमध्ये या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही योजना मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी सर्वोत्तम आहे.4 / 9NPS वात्सल्य ही मुलींच्या निवृत्तीच्या (Retirement) सुरक्षिततेसाठी आहे. कसं काम करते? पालक मुलीच्या नावावर खातं उघडतात, किमान १,००० रुपये वार्षिक आणि १८ वर्षांनंतर ते सामान्य NPS मध्ये रूपांतरित होतं. परतावा (Return): सुमारे ८-१२% (बाजाराशी निगडित). लाभ: ८०सी अंतर्गत १.५ लाख सूट + ८०सीसीडी(१बी) मध्ये ५०,००० रुपये अतिरिक्त सूट. ६०% मॅच्युरिटी करमुक्त. सुरुवात कशी करावी? बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आधार, PAN देऊन खातं उघडावं. उदाहरण: दरवर्षी १,००० रुपये गुंतवणुकीतून १८ वर्षांनंतर मोठा निधी जमा होतो. ही योजना मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवतं.5 / 9PPF ही मुलींसाठी दीर्घकाळासाठी एक सुरक्षित गुंतवणूक आहे. कसं काम करते? मुलीच्या नावावर खातं उघडावं, किमान ५०० रुपये, कमाल १.५ लाख रुपये वार्षिक आणि यात १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. परतावा : ७.१% व्याज (२०२५), करमुक्त आहे. लाभ: ८०सी मध्ये १.५ लाख सूट, मॅच्युरिटी आणि व्याज करमुक्त. सुरुवात कशी करावी? पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आधार, PAN देऊन खातं उघडावं. उदाहरण: दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवल्यास १५ वर्षांनंतर सुमारे ४०-५० लाख रुपये मिळतात. PPF कमी जोखीम (Low Risk) घेणाऱ्यांसाठी चांगला आहे.6 / 9NSC मुलींसाठी सरकारी बॉन्ड आहे. कसं काम करते? किमान १,००० रुपये, कोणतीही कमाल मर्यादा नाही आणि ५ वर्षांचा कालावधी. परतावा : सुमारे ७.७% व्याज (२०२५). लाभ: ८०सी मध्ये १.५ लाख सूट. मॅच्युरिटी करपात्र, परंतु व्याज चक्रवाढ गणलं जातं. सुरुवात कशी करावी? पोस्ट ऑफिसमध्ये आधार, PAN देऊन खातं उघडता येतं. उदाहरण: १ लाख रुपये गुंतवल्यास ५ वर्षांनंतर सुमारे १.५ लाख रुपये मिळतात. NSC सुरक्षित आणि सोपी योजना आहे.7 / 9हा मुलींसाठी फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) सारखा पर्याय आहे. कसं काम करतं? १-५ वर्षांचा कालावधी, किमान १,००० रुपये. परतावा : सुमारे ६.९-७.५% व्याज (२०२५). लाभ: ५ वर्षांच्या कालावधीवर ८०C मध्ये १.५ लाख सूट, परिपक्वता करमुक्त. सुरुवात कशी करावी? पोस्ट ऑफिसमध्ये याचं खातं उघडता येतं. उदाहरण: १ लाख रुपये ५ वर्षांसाठी गुंतवल्यास सुमारे १.४ लाख रुपये मिळतात. ही एक लवचिक आणि सुरक्षित योजना आहे.8 / 9ही मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे. LIC जीवन तरुण योजना मुलांच्या भविष्यासाठी चांगली आहे. किती वर्षांसाठी? ०-१२ वर्षांच्या मुलांसाठी. कसं काम करते? २०-२५ वर्षांच्या कालावधीत, दरवर्षी ७५,००० रुपयांपासून सुरुवात. परिपक्वता : सुमारे ५-१० लाख रुपये मिळू शकतात. प्रीमियम: ८, १०, किंवा १२ वर्षांपर्यंत भरावा लागतो. लाभ: शिक्षण, विवाहासाठी पैसे, कर सवलत (८०C), कर्ज सुविधा, आणि मृत्यू लाभामध्ये १२५% सम अश्योअर्ड. २०२४ मध्ये ८% परतावा. यामध्ये प्रीमियम वेळेवर भरावा लागतो. यात मुलीचं वय १० वर्षांपेक्षा कमी असताना खातं उघडावं. दीर्घकाळ गुंतवणूक ठेवावी.9 / 9(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)