छोट्या शेअरची कमाल..! 33 पैशांच्या स्टॉकनं दिला 1600% परतावा; LICनं खरेदी केले आहेत 48 लाख शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:23 PM2023-07-28T20:23:34+5:302023-07-28T20:32:04+5:30

साधारणपणे केवळ अडीच वर्षांत 1 लाखाचे झाले 17 लाख...!

शेअर बाजारात एका छोट्या शेअरने अल्पावधीतच तब्बल 1600 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. हा शेअर आहे Integra Essentia चा. या कालावधीत कंपनीचा शेअर 33 पैशांवरून 5 रुपयांवर पोहोचला आहे.

इंटेग्रा एसेंशिआच्या (Integra Essentia) शेअर्सवर सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने मोठा डाव लावला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 9.35 रुपये एवढा आहे, तर निचांक 5.16 रुपये आहे.

1 लाखाचे झाले 17 लाख - इंटेग्रा एसेंशिआचा शेअर 27 नोव्हेंबर 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 33 पैशांना होता. तो 28 जुलै 2023 रोजी बीएसईवर 5.85 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने तब्बल 1613 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 27 नोव्हेंबर 2020 रोजी इंटेग्रा एसेंशिआच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता या शेअर्सची व्हॅल्यू 17.72 लाख रुपयांवर पोहोचली असती.

LIC कडे 48.59 लाख शेअर - एप्रिल-जून 2023 या तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सरकारी विमा कंपनी असलेल्या LIC कडे इंटेग्रा एसेंशियाचे 48,59,916 शेअर आहेत. या कंपनीत एलआयसीचा वाटा 1.06 टक्के एवढा आहे.

जानेवारी-मार्च 2023 च्या तिमाहीतही इंटेग्रा एसेंशिआमध्ये एलआयसीची वाटा 1.06 टक्के होता. अर्थात एलआयसीने इंटेग्रा एसेंशिआतील अपल्या होल्डिंगमध्ये कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. या वर्षी आतापर्यंत इंटेग्रा एसेंशिआच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)