शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्ज, घर अन् ट्रेन! आजपासून 'या' 10 बदलांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 12:20 PM

1 / 11
1 सप्टेंबरपासून देशात 11 मोठे बदल घडणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
2 / 11
1 वर्षात बँक खात्यातून 1 कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीएस लागणार आहे.
3 / 11
SBI, PNB सह 8 बँकांचे रेपो रेट आरबीआयशी जोडले जाणार आहेत. जर आरबीआयने रेपो रेटमध्ये घट केली तर ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरही कमी होणार आहे.
4 / 11
घर खरेदी करताना तुम्हाला जास्त टीडीएस द्यावा लागणार आहे. कारण आता आपल्याला क्लब मेंबरशिप आणि कार पार्किंगसारखी सुविधांचे पैसे प्रॉपर्टीच्या दरात जोडून टॅक्समध्ये सूट मिळवू शकत नाही.
5 / 11
घराची दुरुस्तीसाठी जर तुम्ही कंत्राटदाराला 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम देत असाल तर त्यावर 5 टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे.
6 / 11
भूकंप आणि पूर परिस्थिती तसेच हिंसक घटनांमध्ये होणाऱ्या वाहनांच्या नुकसानीसाठी विमा घेऊ शकता. ऑन डॅमेज आणि थर्ड पार्टी विमा एकाच कंपनीकडून घेण्याची सक्ती नसेल.
7 / 11
ज्या लोकांनी अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही. त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून नवीन पॅनकार्ड जारी करण्यात येईल.
8 / 11
ज्या लोकांचे सेवा कर अथवा केंद्रीय उत्पादन कर यांची थकबाकी असेल असा विवादीत प्रकरणात लोकांना काहीप्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन योजना आणली आहे.
9 / 11
नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्याने बेशिस्त वाहन चालकांना चाप बसविण्यासाठी आता दंडाची रक्कम 30 पटीने वाढली आहे.
10 / 11
जर यापुढे तुम्ही 50 हजारांपेक्षा अधिक व्यवहार केला तर त्याची माहिती तुमची बँक आयकर विभागाला देणार आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न तपासासाठी तुमच्या छोट्या व्यवहाराची माहितीही आयकर विभाग मागू शकतं.
11 / 11
भारतीय रेल्वे तिकीट बुकींग पोर्टलवरून ऑनलाइन तिकीट खरेदी केल्यास त्यासाठी सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार आहे.
टॅग्स :Economyअर्थव्यवस्था