साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 08:32 IST
1 / 15Weekly Horoscope: कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, शुक्र कर्क राशीत आहे. रवि, बुध आणि केतु सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशींतून राहील. सध्या गणेशाचे घरोघरी आगमन झालेले आहे. १ सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचे पूजन व २ सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचे विसर्जन होईल. ५ सप्टेंबर रोजी प्रदोष, तर ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. शनिवारी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. सिंह राशीत बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे. 3 / 15सिंह राशीत ग्रहण योग कायम आहे. सूर्य, बुध आणि राहु यांचा समसप्तक योग जुळून आलेला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात कोणत्या राशींना कशी होऊ शकेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? गणेशोत्सवाची सांगता कोणत्या राशींना लाभदायक, पुण्य फलदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: हा कालावधी अनुकूल असणार आहे. पैशांचा ओघ चांगलाच असेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळेल. कोणाकडून उसने पैसे घेऊ नये. कारकिर्दीत काही समस्या निर्माण होतील. एखाद्या कामात खूप घाई कराल, ज्यामुळे वरिष्ठांच्या नजरेस येऊ शकतील, अशा काही चुका होतील. एखाद्या गोष्टीचा ताण विद्यार्थ्यांना येऊ शकतो. एकाग्रतेची कमतरता भासेल. नोकरीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. 5 / 15वृषभ: हा कालावधी मिश्र फलदायी आहे. अपेक्षित धन मिळेल. परंतु, खर्च त्यानुसार कराल. आरामदायी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यात पैसा खर्च कराल. घर किंवा जमिनीची खरेदी करण्याचा विचार करू शकता. कारकिर्दीत मेहनत करावी लागेल. व्यापाऱ्यांनी इतरांच्या भरवशावर कामे करू नयेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची पदोन्नतीसह बदली होण्याची संभावना आहे. विद्यार्थी इतर प्रवृत्तीत गर्क राहतील व त्यामुळे अभ्यासावर ते अपेक्षित लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना मेहनत वाढवावी लागेल. एखाद्या स्पर्धेत सहभागी होणार असतील तर त्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागेल. 6 / 15मिथुन: हा काळ मिश्र फलदायी आहे. आर्थिक बाबींची काळजी करावी लागणार नाही. विविध स्रोतातून आर्थिक प्राप्ती होईल, जी आर्थिक स्थिती मजबूत करेल. एखाद्यास दिलेला शब्द वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यापारी वर्गासाठी कालावधी चांगला आहे. त्यांच्या व्यवसायाची वृद्धी होईल. काही नवीन लोक त्यांना व्यापार विषयक चांगला सल्ला देतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची पदोन्नती झाल्याने त्यांच्या प्राप्तीत वाढ होईल. वरिष्ठांशी त्यांचे संबंध दृढ होतील. विद्यार्थी अभ्यासासाठी वेळ देऊ शकतील. एखाद्या परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. एखाद्या परीक्षेची तयारी करण्याची संधी मिळू शकते.7 / 15कर्क: विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. धनलाभ होण्याची दाट संभावना आहे. परंतु खर्च जास्त कराल. आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार कराल. व्यवसायात एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करू शकाल. कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी आळस झटकून टाकावा लागेल. कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. नोकरीत बदल करण्यासाठी वेळ प्रतिकूल असल्याने नोकरी बदलू नये. विद्यार्थी अभ्यासाविषयी जागरूक राहून अभ्यास करतील व उत्तम यश प्राप्त करतील. एखाद्या नोकरीसाठी परीक्षेची तयारी करू शकतील. त्यात ते यशस्वी होण्याची संभावना आहे. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळेल.8 / 15सिंह: हा काळ मध्यम फलदायी आहे. आर्थिक स्थिती ठीक आहे. खर्चात कोणतीही कपात करणार नाही. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक कराल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह होईल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. व्यवसायावर पूर्ण विश्वास असेल जो त्यांच्या व्यवसायास एक नवीन ओळख देतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती वाढीव कामामुळे त्रस्त होतील. त्यामुळे ते नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. विद्यार्थी त्यांच्या एकाग्रतेवर नियंत्रण मिळवून अभ्यासास थोडा वेळ कमी देतील व इतर वेळ मौज-मजा करण्यास देतील. एखाद्या स्पर्धेची तयारी करू शकतात. दिनचर्येत सुधारणा करावी लागेल.9 / 15कन्या: हा कालावधी आनंदाने भरलेला असेल. प्राप्ती चांगली असल्याने खुश व्हाल. अडकलेला पैसा परत मिळण्याची संभावना आहे. एखाद्या चांगल्या योजनेत दीर्घ काळासाठी आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होईल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जास्त मेहनत करावी लागेल. वरिष्ठ त्यांच्या कामगिरीची प्रशंसा करतील. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करण्यात गर्क राहतील. त्यांना ज्ञान वाढविण्याची उत्तम संधी मिळेल. चांगले यश प्राप्त होईल.10 / 15तूळ: हा कालावधी सामान्य फलदायी आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. तेव्हा खर्च करण्यापूर्वी आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा. शेअर्स बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये, अन्यथा त्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. एखादा सौदा होता-होता रद्द होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे. कामात घाई करू नये. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. बाहेरगावी जाऊन अध्ययन करणे हितावह ठरेल.11 / 15वृश्चिक: काही समस्या येऊ शकतील. आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी प्राप्तीचे स्रोत वाढविण्याचा प्रयत्न कराल. परंतु काही अनपेक्षित खर्च उभे राहतील, जे अनिच्छेने करावे लागतील. व्यापाऱ्यांसाठी कालावधी अनुकूल आहे. एखाद्या प्रॉपर्टीत गुतंवणूक करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्री एखादी मोठी संधी प्राप्त होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी कामावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा विरोधक त्यांच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. अनेक दिवसांपासून एखाद्या कामाची चिंता आपणास होती, ती आता दूर होईल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. 12 / 15धनु: हा काळ सामान्य फलदायी आहे. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. परंतु, खर्चांवर नियंत्रण न ठेवल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणालाही उसने पैसे देऊ नये. इतरांवर अवलंबून राहिल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. विचारपूर्वक कामे करावी लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची प्रतिष्ठा उंचावेल. त्यांना एखाद्या सहकार्याची मदत घ्यावी लागू शकते. विद्यार्थी काहीसे गोंधळून गेल्याने त्यांचे मन विचलित होईल. त्यांना एकाग्रता वाढवावी लागेल. 13 / 15मकर: खर्च वाढण्याची संभावना असल्याने त्यावर नजर ठेवावी लागेल. घाई केल्याने समस्या वाढतील. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी एखादी योजना आखू शकता. कारकिर्दीच्या बाबतीत थोडे सतर्क राहावे लागेल. व्यापारात खोळंबलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचा प्रभाव व्यवसायावर होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतील. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. त्यांना अभ्यासातील समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या गुरुजनांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे त्यांना एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. 14 / 15कुंभ: हा काळ मध्यम फलदायी आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची संभावना आहे. खर्चात वाढ करू शकता. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचे मत घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारकिर्दीत निर्मळ विचार उपयुक्त ठरतील. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे नुकसानदायी ठरू शकते. व्यवसायातील समस्या वाढतील. कोणाकडून कर्ज घेऊ नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामात विचारपूर्वक वाटचाल करावी. कोणालाही न मागता सल्ला देऊ नये. विद्यार्थी मौज-मजा करण्यात वेळ घालवतील. त्यात त्यांना मित्रांची साथ मिळेल. असे सर्व झाल्याने अभ्यासात यश प्राप्त होण्यात समस्या निर्माण होईल. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी त्यांना मेहनत वाढवावी लागेल.15 / 15मीन: विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. खर्चाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. खर्च मोठी डोकेदुखी ठरू शकते. निर्मळ मनाने एखाद्याशी आर्थिक देवाण-घेवाण करावी लागेल. एखादी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित गोष्टींची तपासणी करून घ्यावी. व्यापाऱ्यांना खुशखबर मिळेल. जुन्या योजनेतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. काही नवीन लोकांच्या साथीने ते व्यवसायाची वृद्धी करू शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांच्या सल्ल्याकडे लक्ष द्यावे लागेल. ज्या व्यक्ती नोकरीत काही कारणाने त्रासलेले असतील त्यांना एखादी चांगली संधी मिळू शकेल. विद्यार्थ्यांचे लक्ष हिंडण्या-फिरण्यात व मित्रांसह मौज-मजा करण्यात जास्त असल्याने अभ्यासात ते मागे राहतील ज्या त्यांच्यासाठी समस्या घेऊन येतील.