शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 07:58 IST

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरू व शुक्र मिथुन राशीत, रवि आणि बुध कर्क राशीत आहेत. मंगळ आणि केतु सिंह राशीत असून, सोमवारी मंगळ कन्या राशीत जाईल. प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक या राशींमधून राहील. या सप्ताहात २८ जुलै रोजी विनायक चतुर्थी, २९ जुलै रोजी नागपंचमी, ३० जुलै रोजी श्रियाळ षष्ठी, ३१ जुलै रोजी सीतला सप्तमी आहे.
3 / 15
या आठवड्यात जुलै महिन्याची सांगता होऊन ऑगस्ट महिन्याला सुरुवात होत आहे. ऑगस्ट महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शुक्र कर्क राशीत, तर बुध सिंह राशीत विराजमान होईल. श्रावण महिना कायम राहणार असून, ऑगस्टच्या सांगतेला गणेशोत्सव आहे. एकूण ग्रहस्थिती पाहता, जुलैची सांगता आणि ऑगस्टची सुरुवात कोणत्या राशींना कशी ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना काही चांगले परिणाम मिळतील. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्यासाठी एखादा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कामात इतके रमून जाल की कामगिरी उठून दिसेल व प्रशंसा केली जाईल. व्यापारानिमित्त केलेले प्रवास लाभदायी ठरतील. प्राप्ती सामान्य असल्याने वाढीव खर्च त्रस्त करू शकतील. अभ्यास व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठवड्याची सुरुवात खूपच चांगली आहे. प्रकृतीच्या दृष्टीने आठवडा काहीसा नाजूकच आहे. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
5 / 15
वृषभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. विवाहीतांचे वैवाहिक जीवन रोमांसने भरलेले राहील. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे परिणाम मिळतील. भरपूर मेहनत कराल. व्यापार वृद्धीसाठी प्रयत्नशील राहावे लागेल. ह्या आठवड्यात कोणतेही मोठे काम करू नये. जसे सध्या काम करत आहात तसेच करत राहावे. हा आठवडा आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रतिकूल असल्याने सावध राहावे. घरात एखादे चांगले काम होऊ शकते. त्यामुळे घरी नातेवाईकांची वर्दळ राहील. आर्थिकदृष्ट्या आठवडा सामान्य आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
6 / 15
मिथुन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना सुखद परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामंजस्याने व्यतीत होईल. नोकरी करणाऱ्यांनी मेहनत चालूच ठेवावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. सरकारी निविदा मिळाल्याने त्यांचा फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या सुरवातीस वाढीव प्राप्तीचा फायदा मिळेल. ठोस प्राप्तीसह एखादे अंश कालीन प्राप्तीचे स्रोत मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. मानसिक तणावातून मुक्तता होईल. कुटुंबात एखादा मंगल प्रसंग घडल्याने खुश होऊ शकता. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 15
कर्क: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांसाठी आठवडा सामान्य आहे. नात्याचे महत्त्व समजेल. नोकरी करणाऱ्यांना कामात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा निव्वळ कामावर लक्ष केंद्रित करावे. इतर गोष्टीत स्वारस्य दाखवू नये. व्यापाऱ्यांसाठी आठवडा ठीक आहे. त्यांना कामाप्रती गंभीर व्हावे लागेल. आठवड्याची सुरुवात चांगली होईल व पूर्ण उर्जावान असाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपला अभ्यास नवीन पद्धतीने पुढे नेतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
8 / 15
सिंह: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांना आठवडा मिश्र फळे देणारा आहे. विवाहितांच्या जीवनातील तणाव निवळतील. नाते टिकवून ठेवाल. नोकरी करणाऱ्यांना काम करणे सुखद वाटेल. कामे मग्न होऊन करतील. त्याचे त्यांना उचित फळ मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा काही ना काही घेऊन येत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाल. तसेच कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल. त्यांचे विशेष प्रेम असल्याचे जाणवेल. कामाच्या बाबतीत समन्वय साधू शकाल. त्याचे चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. बरेच काही शिकण्याची त्यांची इच्छा जागृत होईल. त्याचा फायदा त्यांना एखाद्या स्पर्धेत होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
9 / 15
कन्या: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रेमीजन नाते दृढ करून पुढील वाटचाल करतील. प्रेमिकेसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊन सुखद क्षणांचा आनंद घेतील. विवाहितांसाठी आठवडा चांगला आहे. सामंजस्याने नाते दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम होऊन त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. कामात कोणतीही चूक होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांना कामात फायदा होईल. ह्या आठवड्यास लाभदायी होत असल्याचे बघू शकाल. त्यामुळे खुश व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
10 / 15
तूळ: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांना नाते समजून घेणे सोपे होईल. प्रेमिकेच्या सहवासात बराचसा वेळ घालवाल. विवाह ठरू शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन आव्हानांसह वाटचाल करणारे असेल. चुका जाणवतील. काही चुकीचे केले असेल तर आपल्या जोडीदाराकडे क्षमा याचना करावी. नोकरी करणाऱ्यांना कामाचे चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांसाठी काही आव्हाने वाट पहात आहेत. प्राप्तीत वृद्धी होईल. अत्यंत खुश व्हाल. आनंद इतरांसह साजरा करण्यास प्राधान्य द्याल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
11 / 15
वृश्चिक: आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या मानसिक दबावाखाली वावराल. परंतु एखाद्या गोष्टीने मन थोडे आनंदित असेल. प्रेमीजनांना हा आठवडा बरेच काही देणारा आहे. काही जणांचा विवाह ठरू शकतो. विवाहित व्यक्ती त्यांच्या नात्याच्या बाबतीत जास्त गंभीर होतील. जोडीदारावर प्रेमाचा मनसोक्त वर्षाव करून वैयक्तिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चढ-उतार होत असल्याचे जाणवेल. तेव्हा त्यांनी कामाकडे विशेष लक्ष द्यावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. त्यांचा व्यापार शीघ्र गतीने पुढे जाईल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. प्राप्ती थोडी कमी होण्याची संभावना आहे. विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी होतील. एखाद्या स्पर्धेसाठी त्यांची निवड होऊ शकते. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
12 / 15
धनु: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांना सावध राहावे लागेल. विवाहितांचे जीवन थोडे सामान्यच राहील. समस्या कमी होतील इतकेच. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांची पदोन्नती संभवते. एखाद्या नवीन टीमचे नेतृत्व त्यांना करावे लागू शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. ते त्यांच्या कामात प्रगती करतील, ज्याचे सुखद परिणाम त्यांना मिळतील. कुटुंबास महत्त्व द्याल, तसेच त्यांच्या प्रति अत्यंत भावुक व्हाल. कुटुंबीय प्रेमास प्रतिसाद देण्या बरोबरच पाठीशी राहतील. मोठा आधार वाटेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चढ-उतारांचा आहे. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
13 / 15
मकर: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. ते नात्यात प्रेम भरण्याचा प्रयत्न करतील. त्यांची बुद्धिमत्ता उपयुक्त ठरेल, त्यामुळे नोकरीत ते प्रगती करू शकतील. त्यांच्या कामगिरीची प्रशंसा होईल. त्यांच्या कामात येणारे अडथळे आता दूर होऊ लागतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते मेहनतीने व्यवसायात प्रगती करू शकतील. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात थोडी वाढ होईल, परंतु काळजी करणार नाही. हीच एक चांगली बाब ठरेल. विरोधकांवर मात कराल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेतील. प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
14 / 15
कुंभ: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांचे प्रेम दृढ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. नोकरी करणाऱ्यांना कामाचे महत्त्व समजेल, परंतु त्यांना सहकाऱ्यांपासून काही त्रास होऊ शकतो. तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांच्या व्यवसायास गती येऊन चांगला नफा होईल. कामावर लक्ष देऊन त्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न ते करतील. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. कुटुंबियात प्रेम वाढेल. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करतील. ते मन लावून अभ्यास करतील, ज्याचे चांगले परिणाम त्यांना मिळतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
15 / 15
मीन: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजन त्यांच्या नात्यास पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात प्रेमिकेस विवाहासाठी मागणी घालू शकतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. जोडीदार सेवा करेल व दांपत्य जीवनाचा आनंद घ्याल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. ह्या आठवड्यात ते मेहनतीचा पूर्ण लाभ घेऊ शकतील. चांगला फायदा संभवतो. नशिबाची साथ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. मनात धार्मिक विचार येतील. धार्मिक कामात आनंदित व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबियांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीची संधी मिळेल. आपण एखादा दूरवरचा प्रवास करू शकता.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासvinayak chaturthiविनायक चतुर्थीShravan Specialश्रावण स्पेशलNag Panchamiनागपंचमी