बुध-शुक्र गोचर: ६ राशी लकी, सौभाग्याचा काळ; उत्तम यश-प्रगती, फायदेशीर संधी, शुभ-लाभ होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 07:07 IST
1 / 15पुढील काळात बुध आणि शुक्र यांचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी- मंगळ, गुरु आणि हर्षल वृषभ राशीत आहेत. रवि, शुक्र आणि बुध सिंह राशीत आहेत. मात्र २२ रोजी बुध वक्री कर्क राशीत येत आहे तर २४ रोजी शुक्र कन्या राशीत जाऊन केतु शनी युती करेल, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहेत. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. १९ रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आहे. २२ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. २४ रोजी टेंबेस्वामी जयंती आहे. तसेच श्रावणातील व्रत-वैकल्ये साजरी केली जाणार आहेत.3 / 15शुक्र कन्या राशीत आल्याने अनेकविध योग जुळून येत आहेत. केतुशी युती होत असून, शुक्र आणि राहु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच शनी आणि शुक्राचा षडाष्टक योग जुळून येणार आहे. हा आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घेऊया... 4 / 15मेष: आगामी काळ उन्नतीदायक व लाभदायक ठरणारा आहे. अडथळे व अडचणी दूर होऊ शकतील. कार्यात यश मिळविण्यात आपण यशस्वी व्हाल. असे असले तरी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल. असमंजसपणे कोणताही निर्णय न घेणे हितावह ठरेल. प्रेम संबंध दृढ होतील. मधुर वाणी बिघडलेली कामे सुधारण्यास मदतरूप होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. लहान भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्री संघर्षानंतर कार्यसिद्धी होण्याची संभावना आहे. ईश्वर साधना-आराधना व त्या प्रति विश्वास व आस्था वाढेल. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा संकोचाने कोणताही निर्णय घेऊ नका.5 / 15वृषभ: घरातील व बाहेरील लहान-सहान गोष्टींना महत्व देऊ नका. क्रोधीत होऊन किंवा आवेशात येऊन कोणालाही अपशब्द बोलू नका. संपत्तीच्या खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. बाजारात अडकलेला पैसा अप्रत्यक्षपणे मिळेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धापर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात दूरवरचा प्रवास संभवतो. मुलांना मिळालेल्या एखाद्या मोठ्या यशामुळे मान-सन्मानात वृद्धी होईल.6 / 15मिथुन: जीवन संथगतीने वाटचाल करत असल्याचे जाणवेल. निर्धारित काम वेळेवर न झाल्याने मन बेचैन होईल. कार्यक्षेत्री कामाचा भार वाढेल. कामाच्या ठिकाणी लक्ष्यांक पूर्ण होण्यास अडचणी येऊ शकतात. आर्थिक समस्या असेल तर निराकरण करण्याचा प्रयत्न करा. जमीन, घर किंवा वाहन यांच्या खरेदी-विक्रीची योजना काही काळासाठी खंडीत होऊ शकते. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांना खुश करण्यासाठी खिसा थोडा जास्त प्रमाणात रिकामा करावा लागू शकतो.7 / 15कर्क: कामे बिघडवण्याच्या प्रयत्नात ज्या व्यक्ती असतात त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवावे लागेल. कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. कोणत्याही प्रसंगी जोशात येऊन काही करू नका, अन्यथा सामाजिक बदनामी होण्याची संभावना आहे. वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्री होणाऱ्या त्रासांचे निराकरण होण्याची संभावना आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबीत प्रश्न सुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित त्याचा लाभ घ्यावा, अन्यथा दीर्घ कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.8 / 15सिंह: हा कालावधी शुभ फलदायी व सौभाग्यदायी आहे. संगीत, कला, नृत्य इत्यादीतील रुची वाढेल. मित्रांच्या सहवासात मौज-मजा करण्यात भरपूर वेळ जाईल. जमीन, घर, वाहन इत्यादींची खरेदी-विक्री करण्याची मनोकामना पूर्ण होऊ शकते. स्नेह व सहकार्य प्राप्ती होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. मुलांचे सहकार्य मिळेल.9 / 15कन्या: आगामी काळ काहीसा धावपळीचा आहे. कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक बाबीत नियोजनबद्ध काम करणे लाभदायी होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्याने मनात हताशेची भावना उत्पन्न होईल. परंतु सकारात्मक चिंतनानेच उन्नती व प्रगती होईल याची जाणीव ठेवावी.10 / 15तूळ: कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित काही त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळणे काहीसे कठीणच होईल व त्याच्या जोडीने कामाचा व्याप वाढलेला असेल. अर्थात ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नसून, गोष्टी सुरळीत होत असल्याचे दिसून येईल. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळू लागेल. एखादा मोठा निर्णय घेताना आपणास भावंडांसहित कुटुंबातील इतर सर्वांचे समर्थन प्राप्त होईल. एखादी धार्मिक यात्रा संभवते. भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ होईल. व्यवसायाची व्याप्ती वाढवावयाची आहे, त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकेल.11 / 15वृश्चिक: आगामी कालावधी मिश्र फलदायी आहे. जे विद्यार्थी परीक्षेची - स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. गुप्त शत्रू सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे अत्यंत सतर्क राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी योजना पूर्ण होण्याआधी त्या उघड्या करू नयेत, अन्यथा आपले विरोधक त्यात खोडा घालण्याची संभावना आहे. कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक देवाण-घेवाण करताना अत्यंत सावध राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल.12 / 15धनु: कारकिर्दीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी आहे. अपेक्षित पद प्राप्त होऊ शकते. सन्मानित सुद्धा केले जाऊ शकते. मान-सन्मानात वाढ होईल. मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. दीर्घ काळापासून व्यवसाय सुरु करण्याचा किंवा असलेल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा विचार करत असाल तर मनोकामना पूर्ण होऊ शकते. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट संभवते. स्वकियांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मीयता वाढेल. दाम्पत्य जीवन सुखद होईल.13 / 15मकर: सभोवतालच्या घटनांकडे लक्ष न देता ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जीवनातील समस्या शांतपणे एक-एक करून सोडविण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तसे करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा. वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यक्षेत्रात समतोल साधण्यात थोडा त्रास होऊ शकतो. परदेशात स्थायी व्हावयाचे असेल किंवा तेथे रोजगारासाठी प्रयत्नशील असाल तर त्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.14 / 15कुंभ: कारकिर्दीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास सुखद व लाभदायी होतील. कार्यक्षेत्री वरिष्ठांची कृपादृष्टी राहील, तसेच कनिष्ठ पूर्ण सहकार्य करतील. मुख्य बाब म्हणजे जीवनात प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होण्याची असलेली शक्यता होय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीची अतिरिक्त साधने मिळतील. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची झालेली ओळख भविष्यात मोठा लाभ मिळवून देण्यास कारणीभूत ठरेल. जमीन-घर यांच्या खरेदी-विक्रीत कुटुंबाचे सहकार्य व समर्थन मिळेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. दाम्पत्य जीवन सुखद होईल.15 / 15मीन: शुभ फलदायी व यशदायी आहे. जीवनाशी निगडित सर्व प्रकारच्या संधी आपले दार ठोठावत असल्याचे दिसून येईल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना उत्तम संधी प्राप्त होईल. परदेशात जाऊन शिक्षण घ्यावयाचे असेल किंवा तेथे जाऊन नोकरी करावयाची असेल तर मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. व्यापारात अपेक्षित लाभ व प्रगती होत असल्याचे पहावयास मिळेल.