साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ, सुवर्ण संधी; आर्थिक लाभ योग, चांगली बातमी मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:26 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात सूर्य धनू राश धनू राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणतेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, बुध व रवि वृश्चिक राशीत असून, १५ डिसेंबर रोजी रात्री १०:१० वाजता रवी धनू राशीत प्रवेश करेल. शुक्र आणि प्लूटों मकर राशीत, शनी कुंभ राशीत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे. 2 / 15चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील. धनुर्मास सुरू होत आहे. १८ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. २१ पासून उत्तरायण सुरू होत आहे. १५ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा दुपारी २:३२ पर्यंत आहे. 3 / 15सूर्याचे धनु राशीत होणारे गोचर आणि सन २०२४ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी असल्याने आगामी काळ विशेष असल्याचे मानले जात आहे. कोणत्या राशींना आगामी काळात उत्तम लाभ, दिलासादायक घटना, शुभ वार्ता मिळू शकतील? जाणून घ्या...4 / 15मेष: वाद-विवादासाठी तसेच मिश्र फळांसाठी तयार राहण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संभाव्य वाद टाळण्याचा तसेच इतरांच्या भावनांचा आदर राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसेच योग्य वेळी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. व्यापारी संबंधात सतर्क राहावे लागेल. भागीदारीत विश्वास दाखविण्यापूर्वी लक्षपूर्वक चिंतन करावे. कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण किंवा करार नीट समजून घ्यावे. आर्थिक नियोजन विचारपूर्वक करावे. प्रेम संबंधात धैर्य व सामंजस्याने पुढे जावे. एखादे विघ्न आले तर ते सामंजस्याने दूर करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जोडीदाराच्या भावना समजून घेताना धीर धरावा व एकत्रितपणे समस्यांचे निराकरण करावे. प्रकृतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करावा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी व्यायाम, योगासन व प्राणायाम करण्यास विसरू नये. आनंदी व सकारात्मक राहाल.5 / 15वृषभ: हा आठवडा सामान्य व लाभदायी होण्याचे संकेत देत आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कार्यात प्रगती होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या उपलब्धीमुळे प्रतिष्ठा उंचावेल. आनंदित व्हाल. धार्मिक कार्ये होतील. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. पूर्वी एखाद्या व्यापारात किंवा योजनेत केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिक यश मिळण्याची संधी आहे. प्रभागात प्रगती होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात घराशी संबंधित काही निर्णय घेतले जाऊ शकतात. युवकवर्ग मित्रांच्या सहवासात मजा करतील. प्रेम संबंध दृढ व स्थिर होतील. दांपत्य जीवनातील सुख-समृद्धी टिकून राहील. परीक्षा व स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायी असून त्यांना एखादी खुशखबर मिळू शकते. घर-जमीन खरेदी-विक्री होण्याची किंवा पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना आहे. आई-वडील पूर्ण सहकार्य करतील. यशाचे शिखर गाठण्यास ते मदत करतील. हा आठवडा यश, समृद्धी व प्रगतीने भरलेला असल्याचे आपण बघू शकता. हा आठवडा आपल्यासाठी एक शुभ आठवडा होऊ शकतो.6 / 15मिथुन: हा आठवडा पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अधिक सकारात्मक राहील. आठवड्याच्या सुरवातीस कार्यालयाशी संबंधित कामाचा अतिरिक्त भार असू शकतो. परंतु उत्तरार्धात त्यास यशस्वीपणे पूर्ण करण्यास सक्षम असाल. प्रवासात प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी, अन्यथा समस्या उद्भवू शकते. व्यवसायात अपेक्षित लाभ प्राप्त करण्याची संधी मिळेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात जास्त वेळ घालविण्याची इच्छा व्यक्त कराल. वैवाहिक जीवनात सौख्य व माधुर्य असल्याचे जाणवेल. ह्या आठवड्यात मित्रांसह किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाण्याची संधी मिळेल असे दिसते. आनंदित व्हाल. धार्मिक प्रवृत्ती व दान धर्म इत्यादीत मन रमेल. हा आठवडा स्वस्थ व सकारात्मक भावनेसह घालवून अधिकाधिक समृद्धी व सुख-शांतीचा अनुभव घ्या.7 / 15कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी होऊ शकतो. व्यापारात लाभ होऊ शकतो. व्यवसायाची वृद्धी होण्याची संभावना आहे. लोकांशी मिळून-मिसळून कामे केल्याने अधिक लाभ होऊ शकतो. तसेच निश्चित केलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून व सामंजस्याने कामे करावी लागतील. स्पर्धा व परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना आहे. अपेक्षित यश प्राप्तीसाठी उत्साहात वाढ होऊ शकते. यशस्वी होऊ शकाल. हा आठवडा अनेक संधींसह काही आव्हाने देणारा होऊ शकतो. सकारात्मक मानसिकता व अधिकाधिक वेळ शरीराकडे व मनाकडे देण्याची गरज भासेल. धैर्य व सावध राहून आव्हाने सहजपणे पेलून यशस्वी होऊ शकाल.8 / 15सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. लहान-सहान समस्या असून आठवडा लाभदायी होईल. आत्मविश्वास व सामर्थ्य वृद्धिंगत होईल. कौटुंबिक समस्येत समाधान मिळाल्याने मोकळा श्वास घेण्यास मदत होऊ शकेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. ते ध्येय प्राप्तीसाठी तयारी करतील. प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. मुलांकडून सौख्य लाभू शकते. प्रवासात सुखद व लाभदायी बातमी मिळू शकते. नवीन व मोठ्या जवाबदारी मिळू शकते. घर व कार्यालय समतोल साधण्यात काहीसा त्रास होऊ शकतो. कोणाचा अपमान होऊ न देण्याचा प्रयत्न करावा. इतरांशी नाजूक विषयांवर विचार करून योग्य प्रकारे वागण्यावर लक्ष द्यावे. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.9 / 15कन्या: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी होईल. पूर्वार्धात कार्यक्षेत्राशी किंवा व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. हा आठवडा आर्थिक देवाण-घेवाण करण्यास अनुकूल आहे. असे असले तरी पैश्यांचा उपयोग करताना सावध राहावे लागेल. खर्चात वाढ झाल्यास अंदाजपत्रक कोलमडू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी परिस्थितीचा विचार करावा लागेल. तसेच संबंधित योजना किंवा गुंतवणूक समजून घ्यावी लागेल. प्रेमिकेसह हास्य विनोद करण्यात वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांच्याशी मिळून-मिसळून काम करणे हितावह होईल. सहकारी कामे वेळेवर करण्यासाठी मदत करतील व त्यामुळे यशाची पायरी चढू शकाल. अधिकारी व सहकारी ह्यांच्याशी संबंध सुधारण्याची संधी मिळू शकते, जी कामगिरी उंचावण्यास व यशस्वी होण्यास महत्त्वाची असेल.10 / 15तूळ: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी व लाभदायी आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांच्या भेटीमुळे व कनिष्ठांच्या सहकार्यामुळे ऊर्जा व प्रोत्साहन मिळेल. कार्यक्षेत्री उन्नती होऊन लक्ष्यांक गाठण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. जर कोणासमोर प्रेमाची कबुली द्यावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. जे पहिल्या पासून प्रेमात आहेत त्यांचे प्रेम संबंध दृढ होतील. दोघेही एकमेकांप्रती विश्वासासह आपल्या संबंधात माधुर्य निर्माण कराल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात एक सुखी जीवन व्यतीत करू शकाल. एखादी सुखद बातमी मिळण्याची संभावना आहे. अत्यंत आनंदित व्हाल. परंतु कोणाची दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कार्यक्षेत्री उपलब्धतेचे गुणगान व योजनांचा खुलासा कोणा समोर करू नये, अन्यथा आपल्या यशास एखाद्याची दृष्ट लागेल.11 / 15वृश्चिक: हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असू शकतो. परंतु त्याचा प्रभाव कामावरील लक्ष्यावर किंवा एखाद्याच्या टीकेमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर होऊ देऊ नका. व्यापारात सतर्क राहावे लागेल. तसेच खाजगी जीवनात गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. प्रेम संबंध सुखद होण्यासाठी प्रेमिकेच्या भावना समजून घ्याव्या लागतील. एखादा वाद असल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी एखाद्या महिला मित्राचे सहकार्य घेतल्यास फायदा होऊ शकतो. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. कुटुंबियांसह दूरवरच्या प्रवासाची योजना आखल्याने सुखद व मनोरंजक वेळ घालविण्याची संधी मिळेल. मोठ्या खर्चाचा विचार करू शकता. परंतु सुख-सोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी करण्यात जास्त खर्च होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या सर्व बाबी लक्षात ठेवून हा आठवडा यशस्वी करू शकता.12 / 15धनु: हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. परंतु, धैर्य व प्रयत्नाने त्यात यशस्वी होऊ शकता. जबाबदारीचा जास्त भार असल्यामुळे अधिक परिश्रम करण्याची गरज भासेल. हा आठवडा व्यवसायासाठी उत्तम असू शकतो. प्रवास लाभदायी होतील. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्यच आहे. प्रेमिकेशी असलेले प्रेम व विश्वास टिकून राहील. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करू शकाल. जर धैर्याने पाऊल उचलले तर त्यात यशस्वी होऊ शकाल. समस्यांचे निराकरण विचारपूर्वक करण्याची गरज असते ह्याची जाणीव ठेवावी. त्यात कोणत्याही प्रकारे घाई करू नये. धैर्य व संयम बाळगल्याने ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल. सावध राहून व परिश्रम करून आव्हानांचा सामना करावा व ध्येय प्राप्तीसाठी पाऊल उचलावे. धीर धरा व यशस्वी व्हा.13 / 15मकर: हा आठवडा सकारात्मक होण्याची संभावना आहे. कुटुंबाशी संबंधित समस्यांत समाधान मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दिलासा मिळेल. प्रेमिकेशी उत्तम समन्वय असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा शुभ फलदायी आहे. स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची संभावना आहे. उच्च शिक्षणाकडे त्यांचा कल वाढू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनात अधिक मेहनत करण्यास व उत्तम परिणाम प्राप्त करण्यास प्रेरित करण्यात येत आहे. हा आठवडा समृद्ध व सुखद होऊ शकतो. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळू शकते.14 / 15कुंभ: हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. परंतु त्याच बरोबर काही संधी मिळतील. वाणी व व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा एखादे असंवेदनशील बोलण्याने वादास सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांचे सहकार्य फायदेशीर होऊ शकते. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. ऋतुजन्य विकार संभवतात. लहान-सहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भेटीने जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात. प्रेम संबंधात परस्पर विश्वास वाढेल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. एखादी मोठी खुशखबर मिळण्याची संभावना असून त्याने मन प्रसन्न होईल. सामाजिक कार्य, संशोधन व शैक्षणिक कार्याशी संबंधित लोकांसाठी आठवडा शुभ फलदायी होऊ शकतो. प्रयत्नांचे सामर्थ्य मिळेल. आनंद अनुभवास मिळेल.15 / 15मीन: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी व यशदायी आहे. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. व्यावसायिक बाबीत मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी मदत मिळेल. पूर्वीपासून काम करत असणाऱ्यांना जास्तीचा लाभ मिळेल. जमीन व घर ह्यांच्या खरेदी-विक्रीत यशस्वी व्हाल व त्यातून लाभ मिळेल. युवकांचा बहुतांशी वेळ मस्ती व आनंदाने भरलेला असेल. प्रेमीजनांना सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद व समृद्धीमय राहील. कुटुंबियांसह एखादी सहल करू शकता. त्यामुळे मन प्रसन्न होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात मित्रांच्या माध्यमातून लाभ होईल. आपल्या प्राप्तीत अतिरिक्त स्रोत विकसित होतील. यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी काम करण्याची दृढ संकल्पना करावी लागेल. मित्र व कुटुंबियांचे सहकार्य नेहमीच यशाचे साथीदार असतील.