1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात दि. १४ मे २०२५ रोजी गुरू पालट आहे. रवीही राशी परिवर्तन करत आहे. ग्रहस्थिती अशी-रवी आणि बुध मेष राशीत आहेत. दि. १४ मे रोजी रवी वृषभ राशीत प्रवेश करील. गुरु आणि हर्षल वृषभ राशीत आहेत. दि. १४ मे रोजी रात्री १०.३५ वाजता गुरू मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. शुक्र, शनि, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.2 / 15चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशींतून राहील. या सप्ताहात सोमवारी बुद्ध पौर्णिमा व वैशाख स्नान समाप्ती आहे. पुष्टिपती विनायक जयंती आहे. नारद जयंती, वृषभ संक्रांती आहे. शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे. 3 / 15एकंदरीत ग्रहमान पाहता कोणत्या राशींवर आगामी काळात कसा प्रभाव असू शकेल? आर्थिक आघाडी, कुटुंब, शिक्षण, व्यापार, व्यवसाय, नोकरीत काय परिणाम पाहायला मिळू शकतात? जाणून घेऊया...4 / 15मेष: विवाहित व्यक्तींनी त्यांच्या नात्यातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यात ते नक्कीच यशस्वी होऊन आपले नाते दृढ करू शकतील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. आपण एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच पूर्वी जी काही गुंतवणूक केली होती त्यातून चांगला लाभ होईल. बचतीवर लक्ष द्याल. व्यापारास आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठांशी बोलणी करतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा आनंद घेऊन येईल. जे एखाद्या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यांना चांगले परिणाम मिळण्याची संभावना आहे. असे असले तरी त्यांनी वेळ वाया दवडू नये. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक काही समस्या उद्भवू शकतात. निष्कारण क्रोधीत झाल्यास ह्या समस्या वाढतील.5 / 15वृषभ: विवाहितांच्या समस्या वाढतील, ज्यांचे निराकरण करण्यासाठी जोडीदारासह बसून बोलणी करावी लागतील. प्रेमीजन एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे अडचणीत येऊ शकतात. तेव्हा त्यांनी सावध राहावे. ह्या आठवड्यात खर्चात वाढ होईल. घर, दुकान इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यात जास्त पैसा खर्च झाल्याने आर्थिक स्थिती खालावू शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळून मनासारखा फायदा होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगली नोकरी मिळण्याची संभावना आहे. असे असले तरी आपण जर सध्याची नोकरी चालू ठेवलीत तर ते आपणास हितावह होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य परिणाम न मिळाल्याने ते निराश होतील. असे असले तरी मेहनत करणे सोडू नका. ते एखाद्या संशोधनात स्वारस्य दाखवू शकतात.6 / 15मिथुन: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. विवाहितांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्याचा अभाव असल्याने त्यांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. जोडीदाराशी चर्चा करून हा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रेमीजनांना एखाद्या आर्थिक समस्येमुळे नात्यात काही त्रास जाणवेल. आर्थिक बाबतीत आठवडा मिश्र फलदायी आहे. प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून आपण प्राप्तीत वाढ करू शकाल. जो पैसा बुडाला होता तो मिळण्याची संभावना आहे. असे झाल्यास आर्थिक बाजू मजबूत होईल. व्यापारी जुन्या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करतील, जे त्यांच्या हिताचे होऊन व्यापार वाढू शकेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. पगारवाढ झाल्याने आपण प्रसन्न व्हाल. कारकिर्दीत एखादी संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया दवडू नये. अन्यथा आपणास पश्चाताप होईल. तेव्हा त्यांनी आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे.7 / 15कर्क: वैवाहिक जीवनातील नाते पूर्वी सारखेच राहील. काही समस्या दोघांनी चर्चा करून सोडवाव्या लागतील. हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला आहे. दीर्घकाळापासून एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असलात तर ह्या आठवड्यात ती खरेदी करू शकता. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते व्यवसायास परदेशात विस्तारित करण्यात यशस्वी होतील. ह्यासाठी त्यांच्या मित्रांची मदत होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांची बदली झाल्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. ते मित्रांच्या सहवासात व सामाजिक माध्यमात आपला बहुतांश वेळ वाया घालवतील. तेव्हा चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. 8 / 15सिंह: विवाहेच्छुकांना मनाजोगा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस आवश्यक तितका वेळ देऊ शकतील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. आनंद द्विगुणित होईल. व्यापारात एखाद्या सौद्यास अंतिम स्वरूप मिळाल्याने चांगला लाभ होईल. व्यवसायात एखादा भागीदार घेतलात तर व्यवसायास भरभराटी येईल. जेव्हा एखाद्या सौद्यास अंतिम स्वरूप द्याल तेव्हा त्यावर करडी नजर ठेवा, अन्यथा त्यात काही गडबड होऊ शकते. कर्जासाठी अर्ज केला असेल तर तो सहजगत्या मंजूर होऊ शकेल. व्यवसायात एखादी नवीन योजना सुरु करणे हितावह ठरेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील. वरिष्ठ त्यांच्या कामगिरीने प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनाकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या परीक्षेस बसावयाचे असेल तर चांगले परिणाम मिळविण्यासाठी अभ्यासास भरपूर वेळ काढावा लागेल. 9 / 15कन्या: प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. एखादी जमीन खरेदी करण्याची योजना आखली असेल तर ती ह्या आठवड्यात पूर्णत्वास जाण्याची संभावना आहे. असे असले तरी ह्या आठवड्यात खर्चात वाढ होणार असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखाद्या योजनेत जास्तीची आर्थिक गुंतवणूक करू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. व्यापाऱ्यांना कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी जागरूक राहावे लागेल. त्यांना मेहनत वाढवावी लागेल. त्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळणार नाही.10 / 15तूळ: प्रेमीजनांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमिकेस आवश्यक तितका वेळ आपण द्याल. आर्थिक दृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. काही महागड्या वस्तूंची खरेदी करण्यात व हौस भागविण्यात जास्त पैसा खर्च केल्याने आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो. शेअर्स बाजाराशी संबंधित व्यक्तींनी एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार आर्थिक गुंतवणूक करावी. व्यापाऱ्यांना नवीन आर्थिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ते व्यवसायात प्रगती करू शकतील. ह्या आठवड्यात एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी आत्मविश्वास उंचावण्याची गरज भासेल. ह्या आठवड्यात एखाद्या शासकीय नोकरीसाठी परीक्षेस बसण्याची संधी मिळेल.11 / 15वृश्चिक: हा आठवडा प्रेमीजनांसाठी समस्या घेऊन येत आहे. वैवाहिक जीवनात जर एखादी समस्या दीर्घ काळापासून असली तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यानेच नाते दृढ होऊ शकेल. एखाद्या कामात समस्यांना सामोरे जावे लागेल. ह्या आठवड्यात कोणत्याही योजनेत जास्त पैसा गुंतवू नका. ह्या आठवड्यात शेअर्स बाजार प्रतिकूल असेल. एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा पूर्ण करण्याची संधी मिळेल. खर्चात वाढ झाल्याने काहीसे त्रस्त व्हाल. नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. त्यांच्या कामगिरीवर वरिष्ठ प्रसन्न होतील. व्यापारासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांनी जर मित्रांच्या सहवासात जास्त वेळ घालविला असेल तर परीक्षेच्या परिणामांवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. त्यांना अपेक्षित परिणाम मिळण्यात अडचण येईल. त्यांचे मन विचलित होईल. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे.12 / 15धनु: हा आठवडा काहीसा तणावग्रस्त आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा गोंधळाचा आहे. नात्यातील तणावास सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातील समस्यांचे निराकरण करावे लागेल. एकमेकांचे दोष स्वीकारून वाटचाल करावी लागेल. ह्या आठवड्यात पैशाच्या बाबतीत त्रस्त असाल. एखाद्या सरकारी योजनेवर लक्ष द्याल. शेअर्स बाजाराशी संबंधित व्यक्ती पूर्वी घेतलेल्या शेअर्समुळे चांगला पैसा कमावू शकतील. व्यवसायात समस्या वाढविणारा आठवडा असला तरी प्राप्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. एखादे काम भागीदारीत केले असेल तर ते उत्तम असेल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयात एखाद्याशी भांडण केले तर त्याचा प्रभाव नोकरीवर होऊन कदाचित त्यांना नोकरी गमवावी लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात त्यांनी जर मेहनत करण्यात थोडी कुचराई केली तर चांगले परिणाम मिळविण्यात त्यांना त्रास होईल. नोकरीच्या तयारीत असलेल्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. 13 / 15मकर: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात कामात इतके व्यस्त राहाल की आपल्या प्रेमिकेस अत्यंत थोडा वेळ देऊ शकाल. कौटुंबिक समस्यांमुळे विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु त्या दूर करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. काही आर्थिक अडचणी आल्या तरी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून रग्गड पैसा मिळाल्याने हे अडथळे सहजपणे दूर होतील. ह्या आठवड्यात घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकता. ह्या आठवड्यात कोणाशीही उसनवारी करू नये. व्यापाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कोणत्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावी व कोणत्यात करू नये हे न समजल्याने आपला गोंधळ उडेल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात सतर्क राहावे लागेल. काही सहकारी एखादे नवीन षड्यंत्र रचू शकतात. विद्यार्थ्यांनी ज्ञान वाढविण्यावर भर द्यावा. त्यांच्या अभ्यासात येत असलेल्या समस्या एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून दूर होऊ शकतील. 14 / 15कुंभ: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. नात्यास वेळ देऊ शकाल. दोघांनाही एकमेकांच्या सहवासात वेळ घालवून आनंद होईल. वैवाहिक जीवनात संयमित राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारास समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल आहे. एखाद्या प्रॉपर्टीतून पैसा मिळण्याची संभावना आहे. व्यापारी योजनांवर भरपूर खर्च कराल. ह्या आठवड्यात प्रॉपर्टी इत्यादीत गुंतवणूक करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात व्यापारी चांगला पैसा कमवू शकतील. कामा व्यतिरिक्त एखाद्याशी भागीदारी करून नवीन कामास सुरुवात ते करू शकतील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नतीमुळे धावपळ वाढेल. 15 / 15मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आनंद घेऊन येणारा आहे. दोघात ज्या काही शंका होत्या त्या दूर होऊन दोघेही एकमेकांची काळजी घेऊ लागाल. तसेच एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. नाते पूर्वी पेक्षा अधिक दृढ होईल. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून एखादी आनंदवार्ता ऐकण्यास मिळू शकते. जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. आर्थिक दृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात खर्चातील वाढ डोकेदुखी ठरू शकते. खर्च समस्येच्या स्वरूपात येतील. व्यापार विस्तारित करण्यासाठी नवनवीन लोकांशी ओळख कराल. त्याचा लाभ आपल्या व्यवसायास नक्कीच होईल. व्यवसाय पूर्वी पेक्षा वाढेल. खूप प्रगती होईल. ह्या आठवड्यात नोकरीत बदल करणे हितावह होईल. दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. विद्यार्थी त्यांच्या काही व्यक्तिगत समस्येंमुळे त्रस्त होतील. त्यामुळे त्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होईल. असे असले तरी त्यांना अभ्यासाप्रती सतर्क राहावे लागेल. क्रोधात वाहन चालविल्याने समस्या निर्माण होऊ शकते.