साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:47 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू कर्क राशीत, केतु सिंह राशीत आहे. रवी आणि शुक्र तूळ राशीत, तर मंगळ आणि बुध वृश्चिक राशीत आहेत. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींमधून राहील. या सप्ताहात दि. १२ रोजी कालभैरव जयंती आहे. दि. १५ रोजी उत्पत्ती एकादशी आहे. याच कालावधीत गजकेसरी राजयोग, हंस महापुरुष राजयोग आणि रुचक राजयोग जुळून येत आहेत.3 / 15एकंदरीत ग्रहमान पाहता कोणत्या राशींना या आठवड्याचा कालावधी उत्तम धन, धान्य, सुख, समृद्धीने भारलेला असू शकतो. कोणत्या राशींसाठी हा काळ संमिश्र ठरू शकेल. नेमकी काय काळजी घ्याल, जाणून घेऊया...4 / 15मेष: हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक समस्यांना थोडे सामोरे जावे लागू शकते. पैशांशी संबंधित कामे विलंबाने झाली तरी ती सहजपणे होतील. गुंतवणुकीची एखादी योजना आखू शकता. विद्यार्थ्यांनी एकाग्रता जपून ठेवावी. ज्यामुळे अभ्यासादरम्यान त्यांचे लक्ष विचलित होऊ शकणार नाही. अभ्यासात जर एखादी समस्या असली तर ती सहजतेने दूर होऊ शकेल. ह्या आठवड्यात त्यांना एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. कोणतेही काम करण्यात मागे राहणार नाहीत. भरपूर ऊर्जा असेल.5 / 15वृषभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील. असे असले तरी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करावी. कोणालाही पैसे उसने देऊ नये. व्यवसायात मेहनतीचा पूर्ण लाभ मिळेल. एखादा नवीन प्रकल्प पूर्ण होण्याची संभावना आहे. सहकारी व्यवसाय वृद्धिंगत करण्यात मदत करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडे सावध राहावे लागेल. कार्यक्षेत्री कोणत्याही प्रकारच्या राजकारणात सहभागी होऊ नये. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. ते एखाद्या स्पर्धेसाठी मेहनत करतील. त्यात ते यशस्वी होण्याची दाट संभावना आहे. ह्या आठवड्यात एखादे टेन्शन असण्याची शक्यता आहे. 6 / 15मिथुन: हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती ठीक राहील. प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक योजना आखून वाटचाल करावी लागेल. एखादी पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना आहे. व्यापारात काही नवीन ओळख करून घेण्यात यशस्वी व्हाल. काही गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणे नुकसानदायी होईल. एखाद्या कामाच्या बाबतीत अति आत्मविश्वासात राहाल. ह्या आठवड्यात विद्यार्थी ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करतील. ते एखाद्या सरकारी नोकरीच्या स्पर्धेची तयारी करू शकतील. एखादी आर्थिक समस्या त्रस्त करत असेल तर ती दूर होईल. 7 / 15कर्क: हा आठवडा ठीक आहे. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाली तरी मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती होईल. त्यामुळे एखादे काम पैशांअभावी खोळंबले असेल तर ते पूर्ण होऊ शकेल. भविष्यासाठी एखादी चांगली गुंतवणूक करण्याचा विचार कराल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना कामांवर लक्ष ठेवावे लागेल. दुसऱ्याच्या भरवशावर काम सोडले तर ते काम पूर्ण होऊ शकणार नाही. ह्या आठवड्यात कोणाच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या आठवड्यात हातून एखादी चूक होण्याची संभावना असून त्याने समस्या वाढतील. विद्यार्थी उर्जेसह अध्ययन करतील. मित्रांच्या सांगण्यावरून विषय बदलू नये. एखाद्या नोकरीसाठी परीक्षा दिली तर त्यात यशस्वी व्हाल. योगासन व व्यायाम ह्याकडे लक्ष द्यावे.8 / 15सिंह: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक समस्येने आपण त्रासून जाल. परंतु धनप्राप्तीचे मार्ग उघडे रहातील. व्यापारात चांगला लाभ होईल. जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून व्यवसायाची कायापालट करू शकाल. प्राप्ती चांगली होईल. नोकरीत चांगले यश प्राप्त होईल. एखाद्या दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. विद्यार्थ्यांना काही टेन्शन असू शकते. त्यांचे मन गोंधळलेले असेल. त्यांनी समस्या अध्यापकांशी चर्चा करून दूर करून घ्याव्यात. 9 / 15कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात गुंतवणूक करण्याची योजना आखाल. प्राप्ती तर चांगलीच होईल, परंतु खर्च काही कमी असणार नाहीत. मौजेच्या वस्तूंवर भरपूर पैसे खर्च कराल. ह्या आठवड्यात कोणत्याही व्यवसायाची सुरवात करू शकता. ऑनलाइन ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी विचारपूर्वक कामे करावीत. त्यांचे शत्रू त्यांच्याविरुद्ध एखादे षडयंत्र रचू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. तांत्रिक विषयांच्या विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या जोडीने विश्रांतीसाठी थोडा वेळ काढावा लागेल. आरोग्य विषयक समस्या असल्यास वेळेवर औषधोपचार करावेत.10 / 15तूळ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक समस्या दूर होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. व्यापारात चांगला फायदा होईल. परदेशात संपर्क होऊन आपणास मोठ्या ऑर्डर्स मिळतील. ज्यावर खूप मेहनत घ्याल. नोकरीत चांगली ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात पगारवाढ संभवते. कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. असे असले तरी त्यांनी अभ्यासास पूर्ण वेळ द्यावा. मित्र सहकार्य करतील. 11 / 15वृश्चिक: हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात कोणाच्या सांगण्यावरून जमिनीत पैसा गुंतवू नये. गुंतवणुकीची योजना जरी आखली तरी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. ह्या आठवड्यात व्यावसायिक कारणामुळे एखादा प्रवास करू शकता. व्यापारी योजना तडीस नेण्यासाठी भरपूर मेहनत कराल. नोकरी करणाऱ्यांचा मान-सन्मान होईल. एखाद्या कामात जर काही समस्या असली तर ती आता संपुष्टात येऊ शकते. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक अध्ययन करावे. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यास त्यांच्या अध्ययनात समस्या निर्माण होऊ शकते. ते एखाद्या स्पर्धेसाठी खूप मेहनत करतील. ह्या आठवड्यात त्यांना कुटुंबियांकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते.12 / 15धनु: हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा आहे. ह्या आठवड्यात एखादी आर्थिक समस्या असू शकते. अकाउंटचे काम करणाऱ्या लोकांच्या हातून चुक होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात कोणाशीही बोलण्यापूर्वी विचार करावा. व्यापाऱ्यांनी बुद्धिचातुर्याने कामे केल्यास त्यांच्या हिताचे होईल. त्यांच्या नवनवीन योजना त्यांना चांगला लाभ मिळवून देतील. नोकरी करणाऱ्यांनी कोणतेही काम घाईघाईत करू नये. सध्याच्या नोकरीत पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या आठवड्यात त्यांनी इतर प्रवृतींकडे जास्त लक्ष देऊ नये. त्यांनी जर घरापासून दूर जाऊन अभ्यास केला तर त्यांची एकाग्रता उंचावली जाऊन परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतील. आहारावर लक्ष द्यावे.13 / 15मकर: हा आठवडा आपल्यासाठी खुशी घेऊन येत आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बाबीत सावध राहावे. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या आठवड्यात आर्थिक प्राप्ती कमी होण्याची संभावना आहे. तेव्हा आवश्यक वस्तूंसाठीच खर्च करावा. व्यापाऱ्यांना मेहनत वाढवावी लागेल. एखादा नवीन प्रकल्प मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कामात घाई करू नये. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठ कामगिरीने खुश होतील. पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांना अभ्यासातील समस्यांबाबत गुरुजनांशी चर्चा करावी लागेल. कौटुंबिक समस्यांमुळे मन त्रासून जाईल. स्पर्धेसाठी आठवडा अनुकूल आहे. 14 / 15कुंभ: हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती नाजूक राहील. एखादी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी कुटुंबीयांचा सल्ला अवश्य घ्यावा. शेअर्स बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी बाजारातील वातावरण समजून घ्यावे. ह्या आठवड्यात कोणतेही काम घाईघाईत करू नये. व्यापारात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. विद्यार्थी अभ्यासावर पूर्ण लक्ष देतील. त्यांना स्पर्धेत कसे यशस्वी होता येईल ह्याचा अभ्यास करावा. त्यांनी आत्मविश्वास उंचावण्याकडे लक्ष द्यावे. ह्या आठवड्यात जर एखाद्या परीक्षेस बसलात तर मेहनतीच्या जोरावर यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात कामाकडे जास्त लक्ष द्याल व त्यामुळे आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होऊन प्रकृती नाजूक होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 15 / 15मीन: हा आठवडा खुश करणारा आहे. ह्या आठवड्यात उगाच आर्थिक स्थितीची काळजी करत बसाल. धन-धान्यात वृद्धी होईल. बुडालेले पैसे परत मिळण्याची संभावना आहे. गुंतवणुकीची चांगली संधी मिळेल. व्यापारात कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या चांगल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार कराल. महिलांशी संबंधित वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला लाभ होईल. नोकरीत आवडीचे काम मिळाल्याने खुश व्हाल. पदोन्नती संभवते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत अति आत्मविश्वासात राहू नये. अन्यथा अभ्यासातील समस्या वाढू शकतात. ह्या आठवड्यात कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले तर आहाराकडे लक्ष द्यावे.