साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, प्रमोशन-पगारवाढ योग; व्यापारात नफा, चौफेर चौपट लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 07:51 IST
1 / 15या सप्ताहात दि. ७ डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, केतु सिंह राशीत, रवि, बुध, मंगळ आणि शुक्र वृश्चिक राशीत, मंगळ दि. ७ डिसेंबर रोजी रात्री ८.१६ पासून धनु राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील. रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. गुरुवारी कालाष्टमी आहे. संकष्ट चतुर्थीला वृश्चिक राशीत चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच मंगल आदित्य, बुधादित्य, शुक्रादित्य योग जुळून आलेला आहे. गुरू आणि चंद्र यांच्या मिथुन राशीतील युतीमुळे गजकेसरी नामक शुभ राजयोग जुळून येत आहे. 3 / 15मार्गशीर्ष महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. २०२५ या वर्षाचीही सांगता होत आहे. एकूणच ग्रहस्थिती पाहता अनेक राशींसाठी डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा नोकरी, करिअर, शिक्षण, कुटुंब, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडीवर यश, प्रगती, नफा-फायदा आणि अनेक बाबतीत आनंददायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: या आठवड्यात आरोग्याबाबत विशेष सावध राहणे गरजेचे आहे. पचनाचे त्रास वाढू नयेत म्हणून आहार हलका ठेवा. व्यवसायात अति आत्मविश्वासामुळे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. म्हणून अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत वरिष्ठांबरोबर अनावश्यक वाद-विवाद टाळा. कारण यामुळे प्रमोशनचा मार्ग सोपा ठरणार आहे. प्रेमसंबंधांत एखाद्या छोट्या मुद्द्यावरून विवाद होण्याची शक्यता आहे; शांत राहून परिस्थिती हाताळा. गृहस्थ जीवनातही अनावश्यक वाद वाढू नयेत म्हणून संवाद सौम्य ठेवा. आर्थिक स्थिती सामान्य राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून भटकू शकते; मन एकाग्र ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.5 / 15वृषभ: या आठवड्यात मानसिक तणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. मानसिक दडपण वाढू शकते. व्यावसायिक कामांमध्ये विलंब होऊ शकतो. नोकरीत मात्र उत्तम योग असून प्रमोशनची शक्यता आहे; तसेच ट्रान्सफरची शक्यता मजबूत आहे. इंटरव्ह्यू देणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी आठवडा उत्कृष्ट असून नात्यात नावीन्य आणि जवळीकता वाढेल. वैवाहिक जीवनात मात्र एखादा विषय ताणतणाव वाढवू शकतो, त्यामुळे समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून, वाहन खरेदी किंवा स्वतःवर खर्च करण्याचे योग संभवतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत सकारात्मक राहणार आहे, अभ्यासात चांगली प्रगती राहील. एकूणच, मानसिकशांती राखल्यास आठवडा अनुकूल.6 / 15मिथुन: आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे कारण एखादा जुना आजार पुन्हा तोंड वर काढू शकतो. व्यवसायात खूप मेहनत केल्यानेच मार्ग खुलतील; कामात दिरंगाई नको. नोकरीत सहकाऱ्यांची मदत आवश्यक भासेल. आठवडा साधारण पण स्थिर राहील. नोकरी बदलण्याचा विचार सध्या टाळावा. प्रेमसंबंधात शंका किंवा गैरसमजामुळे तणाव वाढू शकतो. म्हणून संवादात स्पष्टता ठेवा. वैवाहिक जीवन मात्र आनंदी आणि सुखद राहील. आर्थिकदृष्ट्या काही ताण येण्याची शक्यता असून, खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे; स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालविण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील.7 / 15कर्क: या आठवड्यात आरोग्य काहीसे कमजोर राहू शकते. व्यवसायात बराच वेळ प्रतीक्षेत असलेला प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे कामामध्ये आनंद वाढेल. नोकरीत ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा खराब होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी आठवडा उत्कृष्ट असून प्रिय व्यक्तीसोबत जवळीकता वाढेल. वैवाहिक जीवनही आनंददायक असून जोडीदारासोबत एखादी ट्रिप होऊ शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहील. पैशांबाबत ताण घेण्याची गरज नाही. अभ्यासात, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादा नातेवाईक मार्गदर्शन किंवा नवीन माहिती देऊ शकतो ज्याचा चांगला फायदा मिळेल. एकूणच आठवडा सकारात्मक आणि उर्जावान राहील.8 / 15सिंह: या आठवड्यात आहाराच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. अति गरम किंवा अति थंड पदार्थ खाल्ल्यास तब्येत बिघडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असून व्यापारानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरीत मेहनतीमध्ये कमी पडू नका; केलेल्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. प्रेमसंबंधांत सौम्य संवाद राखल्यास नात्यातील तणाव कमी होतील. जोडीदाराशी बोलताना कठोर शब्द वापरू नका, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कमी आणि इतर विषयांमध्ये अधिक आकर्षित होऊ शकते. कोणतीही परीक्षा देताना ओव्हरकॉन्फिडन्स टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. एकूणच, आरोग्य आणि निर्णयक्षमता याकडे लक्ष दिल्यास आठवडा लाभदायक ठरेल.9 / 15कन्या: आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय आरोग्यासाठी उत्तम ठरेल. व्यवसायात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मौल्यवान सल्ला किंवा टिप्स मिळू शकतात, ज्याचा फायदा होईल. नोकरीत सतर्क रहा, विरोधकांमुळे वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती जाऊ नये. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज उत्पन्न होऊ नयेत यासाठी शांततेने संवाद साधणे आवश्यक. वैवाहिक जीवनात स्थिरता राहील. सतर्कता व सामंजस्य ठेवा. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात गुंतवणूक टाळणेच योग्य; चुकीच्या निर्णयामुळे नुकसान संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मेहनतीचा असून केलेल्या परिश्रमांचे फळ नक्की मिळेल. एकूणच, सावधपणे चालल्यास आठवडा स्थिर.10 / 15तूळ: आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चुकीच्या आहारामुळे किंवा जुन्या आजारांमुळे त्रास वाढू शकतो. व्यवसाय किंवा नवीन प्रोजेक्टसंबंधी अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीतून ऑफर मिळाली तरी घाईने निर्णय घेऊ नका; सध्याच्या नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. प्रेमसंबंधात तणावाची चिन्हे आहेत. सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात कौटुंबिक समस्यांमुळे वातावरण थोडे तणावपूर्ण होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढतील, त्यामुळे नियोजन आवश्यक. विद्यार्थ्यांना परदेशात किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित. एकूणच, संयम आणि योग्य नियोजन या आठवड्याच्या गुरुकिल्ल्या ठरतील.11 / 15वृश्चिक: या आठवड्यात शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. व्यवसायात नवीन लोकांसोबत प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत मान-सन्मान, प्रगती किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता दिसते. ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधांत मात्र व्यस्ततेमुळे साथीदाराला वेळ देता न आल्याने नाराजी निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात केलेले वचन पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा जोडीदार रागावू शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील; खर्चामुळे बजेट बिघडू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी; दुर्लक्ष केल्यास पुन्हा परीक्षा द्यावी लागू शकते. एकंदरीत, आरोग्य व नात्यांकडे दुर्लक्ष न करता आठवडा संतुलित ठेवा.12 / 15धनु: या आठवड्यात शारीरिक क्षमता थोडी कमी जाणवू शकते. चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असून व्यसनांपासून सवयींपासून दूर राहावे. व्यवसायात उत्तम संधी मिळतील; नवीन कॉन्टॅक्ट्समुळे व्यापार वृद्धिंगत होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर संतुष्ट राहतील. प्रेमसंबंधांसाठी आठवडा थोडा सामान्यच आहे; नात्यात समजूतदारपणा अत्यावश्यक आहे. दांपत्य जीवन सुखद असून जोडीदारासोबत ट्रिप घडू शकते. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढतील पण उत्पन्न कमी राहील, त्यामुळे नियोजन गरजेचे. विद्यार्थ्यांनी मित्रांपासून थोडे लांबचे अंतर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे. एकूणच, संयम आणि शिस्त यामुळे आठवडा नियंत्रित राहील.13 / 15मकर: या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. व्यवसायात चांगली प्रगती होईल; पूर्वी थांबलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. उत्साह वाढेल. नोकरीत जबाबदारीने काम केल्यास वरिष्ठांचा विश्वास संपादन करता येईल. प्रेमसंबंधांत रोमँटिक क्षण अनुभवता येतील; प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनही सुखद आणि शांत राहील; परस्पर सल्ल्याने निर्णय घेतल्यास नाते अधिक दृढ होईल. आर्थिक तंगी काहीशी दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी ओव्हरकॉन्फिडन्स टाळावा; अन्यथा अपेक्षित परिणाम मिळणार नाही. एकंदरीत, संवाद आणि संयम हे आठवड्याचे मुख्य तत्त्व.14 / 15कुंभ: या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतात; व्यापारवृद्धीसाठी नवीन प्रयत्न करता येतील. परदेशी कंपन्यांशी संपर्क वाढल्यास चांगला फायदा होईल. नोकरीत ओव्हरकॉन्फिडन्स टाळा आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर रहा. प्रेमसंबंधांत तणाव वाढू शकतो; थोडा संयम ठेवा. वैवाहिक जीवनातही वाद वाढू शकतात. शांततापूर्ण संवाद आवश्यक. आर्थिकदृष्ट्या खर्च जास्त वाढतील; दिखाव्यापोटी पैसे वाया घालवू नका. गुंतवणुकीचे नियोजन योग्य पद्धतीने करा. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात कमी राहू शकते; मात्र स्पर्धा परीक्षांसाठी आठवडा अनुकूल आहे. एकूणच, संयम आणि नियोजन अत्यावश्यक.15 / 15मीन: आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. व्यवसायात नवीन कल्पनांची रेलचेल असेल; वेबसाइट, प्रोजेक्ट किंवा कामाच्या पद्धतीत बदल केल्यास उत्तम प्रगती होईल. नोकरीतही आठवडा सकारात्मक असून जुन्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील; मनासारखे खर्च करू शकता. परंतु मर्यादा पाळणे गरजेचे. प्रेमसंबंधात स्थिरता येईल आणि तणाव कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल, जेथे जाल, त्या क्षेत्रात फायदा मिळेल. अभ्यासात नाव कमविण्याची उत्तम संधी आहे. एकूणच, आरोग्य आणि निर्णयशक्ती संतुलित ठेवली तर आठवडा यशस्वी ठरेल.