शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समसप्तक हंस राजयोगात विनायक चतुर्थी: ८ राशींना लक्षणीय लाभ, पद-पैसा वृद्धी; शुभ-सुख-समृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:53 IST

1 / 12
Kartik Vinayak Chaturthi October 2025: यंदाच्या २०२५ मधील चातुर्मासातील शेवटची विनायक चतुर्थी शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते.
2 / 12
मराठी वर्षातील सर्वाधिक महत्त्व असलेला चातुर्मास काळ सुरू असून, कार्तिक शुद्ध एकादशीला याची सांगता होईल. विनायक चतुर्थीच्या कालावधीत काही उत्तम राजयोग जुळून आले असून, या राजयोगांचा काही राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
3 / 12
गुरु कर्क राशीत विराजमान असून, यामुळे हंस राजयोग जुळून आला आहे. तसेच राहु आणि केतुचा समसप्तक योग जुळून आलेला आहे. यासह अन्य काही शुभ योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 12
मिथुन: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्तार आणि नफ्याचा काळ आहे. नवीन करार आणि सौदे होण्याची शक्यता आहे. घरी धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
5 / 12
कर्क: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने आदर आणि सन्मान मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. लोकांवर प्रभाव पडेल. अडकलेले पैसे परत मिळवू शकता. उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. एखाद्या मोठ्या व्यवसाय करारामुळे भरीव नफा मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनाचा आनंद अनुभवता येऊ शकेल.
6 / 12
सिंह: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने दीर्घकालीन प्रश्न संपुष्टात येऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. कारकिर्दीतील दीर्घकालीन अडथळे हळूहळू संपू शकतात. रिअल इस्टेट आणि वाहनांशी संबंधित व्यवसायातून लक्षणीय फायदा होऊ शकतो. जलद नफा मिळण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो.
7 / 12
कन्या: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नवीन नोकरीसह पदोन्नती शक्यता आहे. धैर्य आणि शौर्य वाढू शकते. याव्यतिरिक्त संवाद कौशल्य सुधारू शकते. अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात यशस्वी व्हाल. शेअर बाजारातून चांगले पैसे कमवू शकता.
8 / 12
तूळ: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कामगिरीचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. अडकलेल्या आर्थिक बाबी सोडवल्या जाऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळू शकतो.
9 / 12
धनु: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने या राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे अधिक असू शकतो. दीर्घकालीन कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. शिवाय, अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये महत्त्वाचे फायदे शक्य आहेत. व्यवसायात लक्षणीय प्रगती होऊ शकते.
10 / 12
मकर: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोगाने व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात. कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येईल. जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे. जीवनात स्थिरता आणि संतुलनाची एक नवीन भावना निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
11 / 12
मीन: विनायक चतुर्थीला जुळून आलेले राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. नोकरी आणि व्यवसायात अनेक नवीन संधी मिळू शकतात. सर्जनशीलता वेगाने वाढू शकते. अध्यात्माकडे कल असू शकतो. नशीब, भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात खूप फायदे मिळू शकतात.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :vinayak chaturthiविनायक चतुर्थीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मासAdhyatmikआध्यात्मिक