शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:47 IST

1 / 12
२९ जून २०२५ रोजी शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ ही शुक्राचीच रास आहे. स्वराशीत होत असलेला शुक्राचा प्रवेश अनेकार्थाने शुभ मानला जात आहे. २६ जुलै २०२५ पर्यंत शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत असणार आहे.
2 / 12
शुक्राच्या राशी गोचराने मालव्य राजयोगाचा निर्मिती होत असल्याचे म्हटले जात आहे. हा योग अतिशय शुभ मानला गेला आहे. जून महिन्याच्या सांगतेलाच हा योग जुळून येत असल्यामुळे याचा प्रभाव जुलै महिन्यावरही असणार आहे. त्यामुळे जून महिन्याची सांगता आणि जुलै महिन्याची सुरुवात अनेक राशींना उत्तम ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
3 / 12
कुटुंब, रोजगार, करिअर, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर मालव्य राजयोगाचा कसा प्रभाव असू शकेल? कोणत्या राशींना आगामी काळात चांगले लाभ, कल्याणकारी गोष्टींची प्राप्ती होऊ शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
मिथुन: आगामी काळ सकारात्मक ठरू शकते. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. अचानक पैसे मिळू शकतात. आर्थिक परिस्थितीत बळकटी येऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदारासोबत आश्चर्यकारक सामंजस्य राहील. मार्केटिंग, मीडिया या क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो.
5 / 12
कर्क: शुभ संकेत मिळू शकतील. नशिबाची साथ लाभू शकेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामे एखाद्या प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकतील. आर्थिक स्थिती स्थिर राहू शकेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत प्रगती होऊ शकेल.
6 / 12
सिंह: मालव्य राजयोग लाभदायक ठरू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. पैसे कमविण्याच्या संधी मिळू शकतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. चांगले पैसे मिळू शकतात. निर्णय योग्य ठरू शकतील. उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होऊ शकेल.
7 / 12
कन्या: नशिबाची साथ मिळू शकेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आदर केला जाईल. संशोधन किंवा लेखन क्षेत्रात असलेल्यांना आगामी काळ शुभ ठरू शकेल. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो. व्यवसाय करत असाल, तर नवीन करार आणि नफा मिळण्याची संधी मिळेल. लोकप्रियता वाढू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
8 / 12
तूळ: मालव्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. या योगाच्या प्रभावामुळे कामात यश मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफ्याच्या संधी मिळतील. लोकप्रियता वाढेल. लोक कामाची प्रशंसा करू शकतील.
9 / 12
धनु: प्रगती आणि यश मिळू शकेल. नवीन रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आताच्या नोकरीत पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यावसायिकांना इच्छित नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा भागीदारी होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक जीवनातही संतुलन आणि सहकार्य राहील. घरातील सदस्य कामात आणि प्रयत्नांमध्ये साथ देऊ शकतील.
10 / 12
मकर: हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे.
11 / 12
मीन: करिअर किंवा कौटुंबिक बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामाचे वातावरण प्रेरणादायी असेल. फ्रीलान्सिंग, बोनस मिळू शकेल. आधी केलेल्या प्रयत्नांचे फायदे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य