शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: श्रीमंतांच्या घरात 'या' सहापैकी एक तरी वॉलपेपर दिसेलच; तुम्हीही लावा आणि अनुभव घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:08 IST

1 / 7
श्रीमंतांच्या घरी आपल्याला जावेसे वाटते, त्यांचे घर, सजावट, सुशोभीकरण या गोष्टी पाहून आपल्या घरीही बजेटनुसार त्यांचे थोडेफार अनुकरण करावे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण हे अनुकरण कोणत्या बाबतीत असावे, याकडे लक्ष वेधत वास्तू शास्त्रात म्हटले आहे, की पुढील सहापैकी कोणतेही एक छायाचित्र आपल्या घरात लावा आणि सकारात्मक लहरींचा परिणाम व कालांतराने आर्थिक सुबत्ता अनुभवा.
2 / 7
एखादा शांत डोह असावा तसे भगवान बुद्ध यांच्या चेहऱ्यावरील भाव सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत. म्हणून श्रीमंतांच्या घरात भगवान बुद्धांचे छायाचित्र अथवा मूर्ती पद्मासनात विराजमान झालेली दिसते. बंद डोळे, शांत मुद्रा आणि स्मित हास्य पाहून आपलेही मन शांत होते.
3 / 7
सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे आहेत, जे सात वारांचे प्रतीक आहेत. त्यावर स्वार होऊन सूर्यदेव येतात. म्हणून वास्तू शास्त्रात सात धावणाऱ्या घोड्यांचे छायाचित्र लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे आर्थिक भरभराट होते आणि करिअरमध्ये उत्तम प्रगती होते.
4 / 7
कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन. तळ्यात उमललेले कमळ पाहून जितके प्रसन्न वाटते, तेवढेच कमळाचे छायाचित्रही मनःशांती देते. त्यामुळे वास्तू मधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आर्थिक वाढ होते.
5 / 7
अनेक रंगांनी युक्त असलेला मोर नेत्रसूखच नाही तर आनंदही देतो. मोराचे दर्शन रानावनात जाऊ तेव्हा घेऊच, पण वास्तू शास्त्र सांगते, घराच्या भिंतीवर मोराचे चित्र, प्रतिमा लावली असता तुमचे आयुष्यही विविध रंगांनी रंगून जाते आणि आर्थिक स्थैर्य लाभून रंगीबेरंगी आयुष्याचा आस्वाद घेता येतो.
6 / 7
धबधबा प्रत्यक्ष अनुभवणे जितके आनंददायी तेवढीच त्याची प्रतिमाही मन प्रसन्न करणारी असते. धबधबा हे वाढत्या सुबत्तेचे लक्षण आहे. हे चित्र लावल्याने घरात चहूबाजूंनी आर्थिक लाभ होतात आणि लक्ष्मी तुमच्या घरी वास करते.
7 / 7
आपले ध्येयशीखर गाठायचे असेल तर आपल्या डोळ्यासमोर त्याची आठवण करून देणाऱ्या पर्वतरांगांचे छायाचित्र लावा. पर्वत जसे अचल असतात तसेच तुमची कीर्ती, संपत्ती यांनाही स्थिरता प्राप्त होते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHome Decorationगृह सजावट