शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra: घरातून आजारपण निघायचे नाव घेत नाहीये? या वास्तू टिप्स उपयोगी जरूर आजमावून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 14:25 IST

1 / 5
आपल्या सुख दुःखात आपल्या वास्तुचा मोठा हातभार असतो. कारण वास्तुपुरुषाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. मात्र काही कारणास्तव घरामध्ये एकामागोमाग एक आजारपणं सुरू असतील तर वास्तुदोष निर्माण झाला नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी. वास्तुदोष कसा ओळखावा आणि कसा दूर करावा यासाठी काही उपयुक्त टिप्स पुढीलप्रमाणे-
2 / 5
तुमच्या राहत्या घराच्या किंवा इमारतीच्या समोर एखादा मोठा खड्डा असेल, तर तो आधी बुजवून घ्या. त्यामुळे घरातल्या सदस्यांना शारीरिक, मानसिक दुखणी उद्भ्वत राहतात. त्याचप्रमाणे घराच्या, इमारतीच्या समोरील मुख्य बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. तो परिसर अस्वच्छ असल्यास तेही आजारपणाचे कारण बनते.
3 / 5
वास्तूचा मध्यभाग रिकामा असायला हवा. त्याला वास्तूचे ब्रह्मस्थान म्हणतात. पूर्वीच्या काळी चौसोपी वाड्यात मधला भाग अंगणासारखा मोकळा असे. आताच्या काळात घरात तसे मोकळे अंगण करता आले नाही, तरी निदान त्या जागेवर जड सामान, फर्निचर, सोफासेट, टेबल या गोष्टी ठेवू नयेत. तेवढा भाग मोकळा ठेवला पाहिजे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
4 / 5
उत्तर पूर्व दिशा, ज्याला ईशान्य कोन म्हटले जाते, ती जागा भगवंताच्या वास्तव्याची समजली जाते. त्या दिशेला टॉयलेट किंवा शिडी असणे, वास्तुदोषाचे मोठे कारण मानले जाते. त्यामुळे घरात सतत आजारपण येते. महिलांना देखील शारीरिक व्याधी संभवतात. त्या दिशेला देवघर असणेच शुभ ठरते. परंतु आता त्यात बदल करणे शक्य नसेल, तर किमान घराचा प्रत्येक ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आजारी व्यक्तीने ईशान्येकडे डोके करून झोपू नये. या नियमांचे पालन करावे.
5 / 5
वास्तूमध्ये स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय दिशेला असले पाहिजे. ती दिशा स्वयंपाकघराच्या दृष्टीने लाभदायक ठरते. परंतु तसे नसेल, तर घरातील सदस्यांमध्ये वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसते. विशेषतः घरातल्या कमावत्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होतो. परंतु तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल, तर जिथे स्वयंपाक घर आहे, त्या जागी भिंतींना ट्रॉली किचनला लाल रंग लावून घ्यावा. म्हणजे वास्तुदोष दूर होऊन सर्वांची तब्येत ठीक राहते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र