Vastu Shastra: २०२४ मध्ये सत्ता, संपत्ती आणि सुख हवे असेल तर घरातून आत्ताच हद्दपार करा 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:34 IST
1 / 6वास्तुशास्त्रात सांगितलेले काही नियम २०२४ वर्ष सुरू होण्यापूर्वी पाळले तर पुढचे वर्ष खूप आनंदाचे देऊ शकते. यासाठी घरातून पुढे दिलेल्या नकारात्मक गोष्टी काढून टाकाव्या लागतील, ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात.2 / 6घराच्या पूर्व दिशेला कोणतीही जड वस्तू ठेवू नका. घराच्या पूर्व दिशेला जड वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढते. घर मोठे असल्यास ईशान्य दिशेला पाण्याची टाकी आणि कारंजे बनवावे. मात्र ही जागा सकारात्मक ऊर्जेची असल्याने जड वस्तू ठेवून ती ऊर्जा अडवू नये. 3 / 6घरात कुठेही काटेरी झाडे नसावीत. अलीकडे निवडुंगाचे अनेक प्रकार मिळतात. काही प्रकार आकर्षकही असतात, मात्र काटे आणि सुख यांचा ३६ चा आकडा असल्याने अशी काटेरी रोपं कामाची नाहीत. शोभेसाठी देखील ती घरात ठेवू नयेत. कार्यालयात ठेवली तरी चालेल, पण पर्सनल केबिन मध्ये ठेवू नये. 4 / 6बेडरूममध्ये देव किंवा पितरांचे फोटो लावू नका. तसेच बेडच्या बरोबर समोर आरसा नसावा. सकाळी उठल्याबरोबर त्यात चेहरा दिसेल अशा बेताने आरसा ठेवू नये. त्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. पलंगाच्या बाजूच्या भिंतीवर मोराच्या पिसाच्या किंवा हंसाच्या जोडीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा.5 / 6घरामध्ये रद्दी, बंद पडलेले घड्याळ, गंजलेले कुलूप किंवा अशी कोणतीही वस्तू असल्यास ती ताबडतोब घराबाहेर फेकून द्या. या गोष्टी प्रगतीच्या आड येतात. घरात पैशांचा प्रवाह थांबतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.6 / 6२०२४ मध्ये तुम्हाला सुख आणि संपत्ती मिळवायची असेल तर घरात तुळशी आणि शमीची रोपे लावा. या वर्षीच्या अंकाचा स्वामी शनि आहे. त्यादृष्टीनेही ही दोन रोपे तुमच्या घराचे रक्षण करेल.