शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra : घरात अटॅच बाथरुम आहे, तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:58 IST

1 / 8
Attach Bathroom Vastu Tips: घरामध्ये बाथरुम कोणत्या दिशेला असावे याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यासोबतच जर तुमच्या घरात बेडरूमसोबत अटॅच बाथरूम असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
2 / 8
असे मानले जाते की जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमचे पैसे पाण्यासारखे खर्च होतील. तुमच्या घरात अटॅच बाथरूम असल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 8
तुमच्या घरातील खोलीला बाथरूम जोडलेले असेल तर त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खोलीला जोडलेले बाथरूम कधीही अस्वच्छ असू नये. अन्यथा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला त्यामुळे आर्थिक नुकसानही सोसावे लागू शकते. यासोबत असे मानले जाते की जर तुमच्या घरातील बाथरूम अस्वच्छ राहिल्यास घरातील सदस्यांना झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. एवढेच नाही तर पती-पत्नीच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो असे म्हटले जाते.
4 / 8
जर तुमच्या घरामध्ये खोल्यांसोबत बाथरुमही जोडलेले असतील तर त्यांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. टॉयलेट सीट तुटलेली नसावी आणि ती स्वच्छ असावी हे लक्षात ठेवा. याशिवाय बाथरूममधील नळातूनही सतत पाणी पडत राहू नये. बाथरुमचा दरवाजाही तुटलेला नसावा. यासोबतच शॅम्पूच्या रिकाम्या बाटल्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी बाथरूममध्ये पडू नयेत याचीही काळजी घ्यावी लागेल. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या घरातील नकारात्मकताही वाढते असे म्हटले जाते.
5 / 8
जर तुमच्या बेडरूमला बाथरूम जोडलेले असेल तर लक्षात ठेवा की तुमचे दोन्ही पाय बाथरूमच्या दिशेने नसावेत. असे झाले तर तुमच्या घरात पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता असते. झोपण्यासाठी सर्वात योग्य डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असावेत. जर पर्याय नसेल, तर लक्षात ठेवा की बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. यासोबतच हेही लक्षात ठेवा की तुमचा बेड बाथरूमच्या भिंतीला लागून असू नये.
6 / 8
जर तुमच्या खोलीला बाथरूम जोडलेले असेल तर लक्षात ठेवा की बाथरूमच्या भिंतीवर आणि फरशीवर हलक्या रंगाच्या टाइल्स वापराव्यात. बाथरूमच्या भिंतीचा रंग आणि दरवाजाही हलक्या रंगाचा असावा. यामध्ये तुम्ही आकाशी, क्रीम किंवा हलका जांभळा रंग वापरू शकता. बाथरूममध्ये चुकूनही काळा किंवा ब्राऊन रंग वापरू नका.
7 / 8
असे अनेकदा घडते की बाथरूम वापरल्यानंतर लोक टॉयलेट सीटचे झाकण लावत नाहीत. बहुतांश घरांमध्ये असा प्रकार दिसून येतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात टॉयलेट सीटचे झाकण उघडे ठेवले तर धनाची होणारी हानी कोणीही थांबवू शकत नाही.
8 / 8
तुमच्या घरात जोडलेले बाथरूम असेल तर त्याची नकारात्मकता दूर करण्यासाठी काचेच्या भांड्यात सैधव मीट भरा. दर आठवड्याला हे मीठ बदलत राहा. बाथरूममध्ये मीठ फ्लश करा आणि पुन्हा दुसरे मीठ घाला. असे केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात असे म्हटले जाते. (टीप - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल, असं सांगितलं जात आहे.)
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र