शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tuesday Hanuman Tips: मंगळवारी आणि शनिवारी मारुतीरायाला अप्रिय असलेल्या 'या' गोष्टी प्रामुख्याने टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 4:26 PM

1 / 5
तुमचा साखरपुडा होणार असेल, तर त्याची मुख्य खरेदी अर्थात अंगठीची खरेदी या दोन दिवशी करू नका. लग्न ठरण्यासाठी मारुती रायाची उपासना करा सांगितले जात असले तरीही दोन जीवांना परस्पराशी जोडणारी अंगठी मंगळवारी किंवा शनिवारी खरेदी करू नये.
2 / 5
बलसंवर्धनासाठी हनुमंताला आदर्श मानले जाते, म्हणून मंगळवारी आणि शनिवारी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते. जेणेकरून शरीराला आणि बुद्धीला जडत्व येणार नाही आणि भक्तीला शक्तीचीही जोड मिळेल.
3 / 5
मंगळवारी नखे कापली, केस कापले तरी हरकत नाही, परंतु शनिवारी या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. कारण शनी देवांना स्वच्छता प्रिय असली, तरीदेखील त्यांच्या वारी या गोष्टी केल्याचे त्यांना आवडत नाहीत. याउलट दानधर्म, गरजूंना मदत, ज्येष्ठांची सेवा त्यांना विशेष आवडते.
4 / 5
मंगळवारी आणि शनिवारी नवीन कपडे घालणे टाळा. नवीन कपड्यांचे उदघाटन करायचे असेल तर गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो. जर वस्त्रदान करणार असाल तर मात्र कोणत्याही दिवसाचे बंधन नाही.
5 / 5
मंगल दोष टाळायचा असेल तर मंगळवारी काळे कपडे घालणे टाळा. हनुमंताला आणि शनी देवाला शेंदरी रंग प्रिय आहे. या दोन्ही दिवशी काही मुख्य कामे करावयाची असल्यास पिवळा, केशरी, लाल रंगाचे कपडे घाला, लाभ होईल!