शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Trigrahi Yoga 2025: १५ जून रोजी त्रिग्रही योगात पाच राशींना आर्थिक लाभ तसेच पदोन्नतीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:30 IST

1 / 7
येत्या रविवारी म्हणजेच १५ जून रोजी ग्रहांचा राजा सूर्य, जो कीर्ती आणि तेजाचा कारक आहे, तो मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. त्याच वेळी, गुरू मिथुन राशीत पोहोचला असेल आणि बुद्धीचा, यशाचा कारक असणारा बुध ग्रहदेखील मिथुन राशीत पोहोचत असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. त्याचा फायदा कोणत्या ५ राशींना होऊ शकतो ते जाणून घेऊया.
2 / 7
सूर्य मिथुन राशीत भ्रमण करेल तेव्हा गुरु आदित्य योग आणि बुधादित्य योग तयार होईल. हे दोन्ही योग यश, कीर्ती, मानसन्मान, आर्थिक वाढ असे लाभ देतात. पण हे लाभ फक्त पाच राशींच्या पदरात पडणार आहेत, त्या राशी कोणत्या ते जाणून घेऊ.
3 / 7
वृषभ राशीच्या लोकांसाठी, त्रिग्रही योग खूप लाभ देईल. शुभ कार्यांवर पैसे खर्च करता येतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. धनप्राप्तीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आर्थिक स्थिती वाढेल. तुमच्या बोलण्याने आणि कृतीने लोकांची मने जिंकू शकाल. हा काळ लोकप्रियता देईल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. नोकरीत प्रगती होईल.
4 / 7
मिथुन राशीत त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीचा आनंद घेता येईल. समाजात मानसन्मान वाढेल. करिअर आणि जीवनात मोठे बदल होतील. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमताही वाढेल. नेतृत्त्वाने लोकांचे मन जिंकाल.
5 / 7
तूळ राशीच्या लोकांवर त्रिग्रह योगाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद फळतील. लोक अध्यात्माकडे आकर्षित होतील. तीर्थयात्रेला जाऊ शकतील. उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सरकारी नोकरीत उच्च पद मिळविण्यात लोक यशस्वी होतील.
6 / 7
धनु राशीच्या लोकांवर त्रिग्रही योगाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद आणि शांतता लाभेल. हा काळ व्यवसायात फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जीवनात आनंद वाढेल. या काळात मोठे निर्णय घेऊ शकाल. विवाहेच्छूकांचे विवाह जुळतील.
7 / 7
कुंभ राशीच्या लोकांसाठी ही त्रिग्रही युती शुभ ठरू शकते. सर्व बाजूंनी यश मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुले पालकांना आनंदाची बातमी देऊ शकतात. लोकांचा आध्यात्मिक क्षेत्रात कल वाढेल. पोटाशी संबंधित समस्या दूर होतील. धनप्राप्तीचे नवे साधन सापडेल. येत्या काळात शुभ वार्ता कळतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य