शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कन्या राशीत त्रिग्रही योग: ‘या’ ४ राशी भाग्यवान; महिनाभर लाभ, आर्थिक वृद्धीसह फायदेशीर काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 2:08 PM

1 / 9
सप्टेंबर महिना अतिशय उत्तम मानला जात आहे. नवग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह या महिन्यात राशीपरिवर्तन करत आहेत. याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर प्रभाव राहणार आहे. तसेच या महिन्यात अनेक अद्भूत शुभ योगही जुळून येत आहेत. याचा सकारात्मक परिणाम काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. (trigrahi yog in virgo 2022)
2 / 9
प्रत्येक महिन्यात एक राशी परिवर्तन होत असते. ज्यामुळे ग्रहांच्या राशी बदलतात. कधीकधी एकाच राशीतील अनेक ग्रहांच्या हालचाली ज्योतिषशास्त्रीय घटनेचे महत्त्व आणखी वाढवू शकतात. सप्टेंबर महिना असाच काहीसा घेऊन येणार आहे. (trigrahi yoga in kanya rashi 2022)
3 / 9
ज्योतिष शास्त्रात सप्टेंबरमधील ३ तारखांना खूप महत्त्व आहे. १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीमध्ये वक्री होणार आहे. यानंतर १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत सूर्य ग्रहाचे महत्त्वपूर्ण गोचर होईल. शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीतील तिसरी महत्त्वाची घटना असेल. शुक्र २४ सप्टेंबर रोजी कन्या राशीत विराजमान होत आहे.
4 / 9
या तीन ग्रहांच्या कन्या राशीतील गोचरामुळे शुभ मानला गेलेला त्रिग्रही योग जुळून येत आहे. याशिवाय काही अद्भूत असे शुभ योगही या कालावधीत जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्यातील ग्रहांच्या शुभस्थितीचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग यशकारक ठरू शकेल. अपूर्ण व रखडलेली कामे यावेळी पूर्ण होतील. तुम्हाला कामात यश मिळेल. विरोधकांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता वाढू शकेल. आरोग्य चांगले राहील. सरकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेणार्‍यांसाठी हा अत्यंत फायदेशीर कालावधी असणार आहे. काही सकारात्मक बातम्या मिळतील.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. या काळात कौटुंबिक संबंध विशेषतः मजबूत असतील. घराच्या नूतनीकरणाचा विचार प्रत्यक्षात आणू शकाल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. काम करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. या कालावधीत बुध वक्री होत असल्याचे शुभ परिणाम विद्यार्थ्यांना मिळू शकतील. मेहनतीचे फळही मिळेल.
7 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकेल. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन उत्तम असेल. आरोग्यासंबंधीचे प्रश्न सुटतील. कामात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. प्रवास भाग्यकारक ठरू शकतील. चांगले कौटुंबिक जीवन आणि समाजात अधिक आदर सोबतच त्यांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, ज्यामुळे तुमच्याकडे अधिकाधिक पैसा जमा होत राहील. तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. चांगले कौटुंबिक वातावरण आणि तुमच्या रोमँटिक नातेसंबंधात अनुकूल परिणाम जाणवतील. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होऊ शकतील.
9 / 9
त्रिग्रही योगासह कन्या राशीत जुळून येत असलेला लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला गेला आहे. हा योग बुद्धी आणि ज्ञानाने समृद्धी देतो, अशी मान्यता आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, त्रिग्रही योगाचा तुमच्यावरील प्रभाव पाहण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य