By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 22:34 IST
1 / 15वर्ष 2023 मधील फेब्रुवारी महिना हा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण 13 फेब्रुवारीला सूर्य राशीपरिवर्तन करून मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असल्याचे मानले जाते. महत्वाचे म्हणजे, शनिदेव आधीपासूनच कुंभ राशीत आहेत. यामुळे पुढील महिन्यात कुंभ राशीत दोन शत्रू ग्रहांचा योग होत आहे. शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत. मात्र, दोघांनाही एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जाते. हा शत्रू योग १४ मार्चपर्यंत राहील.2 / 15यापूर्वी 7 फेब्रुवारीला बुध राशी परिवर्तन करून मकर राशीत येईल आणि महिन्याच्या शेवटी 15 फेब्रुवारीला शुक्राचे राशी परिवर्तन होईल. ज्योतिषशास्त्रात आणि राशिफळात ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती आणि चाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या राशीच्या लोकांवर दिसून येत असतो.3 / 15महत्वाची गोष्ट म्हणजे, 13 फेब्रुवारीचे सूर्याचे राशी परिवर्तन काही राशींसाठी चांगले परिणाम देणारे असेल. तर काही राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढवणारे असेल. तर जाणून घेऊयात सर्वच्या सर्व 12 राशींवर याचा काय प्रभाव पडू शकतो यासंदर्भात... 4 / 15मेष - या राशीच्या लोकांना वाहन, भूमी, खरेदी-विक्रीतून लाभ होईल. यशात वाढ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जर तुम्ही एखाद्या कामात यश मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचे काम पूर्ण होईल. एकंदरीत मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत शुभ असणार आहे.5 / 15वृषभ - या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात अपेक्षित वाढ संभवते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल. व्यापारी वर्गासाठी हा महिना लाभदायक ठरेल.6 / 15मिथुन - या राशीच्या लोकांसाठी हा महिना काही प्रणात कठीण जाईल. संघर्षानंतर यश मिळेल. कार्यक्षेत्रात अडथळे येऊ शकतात. थोडे सावध राहून काम करा. 7 / 15कर्क - या राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक दृष्टिने चांगला राहील. मित्रांच्या मदतीने व्यवसाय वाढेल. शनीची ढय्या राहील. परिस्थिती सामान्य राहील.8 / 15सिंह - या महिन्याच्या मध्यापर्यंत घरगुती समस्या दूर होतील. थांबवलेले किंवा कुणाला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल.9 / 15कन्या - आर्थिक प्रगती होईल. व्यवसाय अथवा नोकरीत लोकांचे सहकार्य मिळेल. पत्नीच्या प्रकृतीची चिंता राहील. आरोग्याची काळजी घ्या.10 / 15तुळ - या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अडचणी वाढवणारा असेल. विश्वासघात होऊ शकतो. मेहनत करूनही अपयश दिसेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता नाही.11 / 15वृश्चिक - या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत शुभ असणार आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात आनंद येईल. जमीन, घर अथवा वाहन खरेदी होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात गती मिळेल. बिघडलेली कामे होऊ शकतात.12 / 15धनु - या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असणार आहे. या महिन्यात तुम्हाला आर्थिक आघाडीवर प्रचंड लाभ होईल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना फायदा होईल. धन लाभ होईल.13 / 15मकर - सूर्य आणि इतर ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे मानसिक त्रास होईल. प्रियजनांचे सहकार्य लाभेल. मुलांप्रति चिंता वाढू शकते.14 / 15कुंभ - या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत शुभ असणार आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल.15 / 15मीन - मुलांच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी हा महिना अत्यंत शुभ राहील. मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्या कामावर खूश होऊन लोक तुमची प्रशंसा करतील. (टीप - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)