शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:39 IST

1 / 15
नवग्रहांमध्ये सूर्य राजा मानला गेला आहे. सूर्याचे स्थान वरचे आहे. प्रत्येक महिन्याला सूर्य राशीपरिवर्तन करत असतो. सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्य कन्या राशीत विराजमान झाला आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य कन्या राशीत असणार आहे.
2 / 15
कन्या राशीत बुधही विराजमान आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. सूर्याच्या कन्या राशीतील प्रवेशानंतर बुधादित्य नामक राजयोग जुळून आला आहे. हे दोन्ही ग्रह कन्या राशीत असेपर्यंत हा योग कायम असणार आहे. दुसरे म्हणजे मीन राशीतील शनि आणि सूर्य-बुधाचा समसप्तक योग जुळून आला आहे.
3 / 15
ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनि पिता-पुत्र आहेत. असे असले तरी दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. कन्या राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि मीन राशीतील शनि आमने-सामने आले आहेत. या एकूण ग्रहमानाला कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? पुढील महिनाभर कोणते उपाय करणे अत्यंत उपयुक्त, शुभ फलदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: सूर्य कन्या संक्रांति पासूनचा एक महिन्याचा कालावधी चांगला आहे. सामंजस्याच्या अभावामुळे वाद सुद्धा होऊ शकतात. जीवनात शुभ काळाचे आगमन होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ होईल. व्यापारात प्रगती होईल. कामाचा भार वाढू शकतो. खर्चात वाढ होऊ शकते. जर परदेश प्रवास करावयाचा असेल तर त्यात यश प्राप्ती होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. आहाराच्या बाबतीत सतर्क राहावे. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा जप करावा, लाभ होईल.
5 / 15
वृषभ: सूर्याच्या कन्या राशीतील गोचराचा चांगला प्रभाव पाहावयास मिळू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय साधावा. सामंजस्याच्या अभावामुळे मतभेद होऊ शकतात. जमीन-जुमल्याच्या कामात मदत मिळेल. प्राप्तीचे नवीन स्रोत झाल्याने लाभ होईल. कार्यक्षेत्री कामाचा दबाव असू शकतो. व्यापाऱ्यांना थोडे सतर्क राहावे लागेल. कर्जफेड करण्यात मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूपच चांगला आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावा, लाभ होईल.
6 / 15
मिथुन: सूर्याचे कन्या राशीतील गोचर अनुकूल असणार आहे. नातेसंबंधांसाठी कालावधी चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. वडिलांशी संबंध दृढ होतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी देण्यात येऊ शकते. व्यापार वृद्धिंगत होईल. शेअर्स बाजार व सट्टा इत्यादीत लाभ होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. इतकेच नव्हे तर पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे घरातील आनंद द्विगुणित होईल. प्रकृती सुद्धा चांगली राहील. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे लाभदायी होईल.
7 / 15
कर्क: सूर्याचे कन्या राशीतील गोचर मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. त्याचा प्रभाव वैवाहिक नात्यावर होऊ शकतो. नवनवीन गोष्टी करण्यास उत्साहित राहाल. असे असले तरी काम स्थगित होऊ शकते. धार्मिक यात्रा होऊ शकतात. सरकारी कामाचा लाभ होईल. व्यापारात नुकसान संभवते. आर्थिक स्थिती टिकवून ठेवण्यासाठी सावधपणे काम करावे लागेल. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा जप करणे हितकारक होईल.
8 / 15
सिंह: सूर्याचे कन्या राशीतील गोचर शुभ फलदायी आहे. लाभ होईल. कौटुंबिक जीवनात काही त्रास असू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रत्येक काम यशस्वी होईल. कोणत्याही प्रकारे कर्ज घेऊ नये. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कार्यक्षेत्री कामाचा दबाव वाढू शकतो. व्यापारात स्पर्धा वाढू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-सूर्य मंत्राचा जप फलदायी होईल.
9 / 15
कन्या: सूर्याचे हे भ्रमण राशीतून होत आहे. हे भ्रमण विशेष लाभदायी होईल. वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी मतभेद संभवतात. नात्यावर ह्याचा नकारात्मक परिणाम होताना दिसू शकतो. आर्थिक बाबतीत बेफिकीरी होऊ शकते. एखाद्या मोठ्या समस्येतून दिलासा मिळाल्याने मानसिक शांतता जाणवेल. गोचराच्या प्रभावामुळे थोडा अहंकार बघावयास मिळू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्यावे. उपाय:-भगवान सूर्याची उपासना करावी, लाभ होईल.
10 / 15
तूळ: सूर्याच्या कन्येतील भ्रमणाचा चांगला प्रभाव होत असल्याचे दिसेल. असे असले तरी ह्या दरम्यान सावध राहावे लागेल. जोडीदाराशी संवाद कमी होईल. खर्चात वाढ होईल. परदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. उपाय:- गोमातेला रोज पोळी खाऊ घालणे लाभदायी होईल.
11 / 15
वृश्चिक: सूर्याच्या कन्येतील गोचराचा प्रभाव नाते संबंधांसाठी अनुकूल आहे. कारकिर्दीच्या दृष्टीने कालावधी चांगला आहे. एखादी नवीन नोकरी मिळू शकते. व्यापारासाठी दिवस अनुकूल आहेत. प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसू शकते. एखादा नवीन व्यापार सुरू करू शकता. सामाजिक मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. उपाय:-गायत्री उपासना लाभदायी होईल.
12 / 15
धनु: सूर्याचे हे गोचर चांगले आहे. नातेसंबंध चांगले राहतील. दांपत्य जीवनात माधुर्य येईल. नोकरी व व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. पदोन्नती संभवते. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. शासकीय कामातून लाभ होईल. व्यापारात लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण लाभदायी होईल.
13 / 15
मकर: सूर्याचे हे गोचर विशेष चांगले नाही. थोडे सावध राहावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाद होऊ शकतो. कौटुंबिक वाद संभवतात. कारकिर्दीत तणावास सामोरे जावे लागू शकते. सामंजस्याने कामे केल्यास व्यापारात लाभ होईल. एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाण्याची संधी मिळेल. नोकरीत स्थान परिवर्तन संभवते. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. उपाय:- आजारी लोकांची सेवा करणे फलदायी होईल.
14 / 15
कुंभ: सूर्याचे हे गोचर काही विशेष असे चांगले नाही. असे असले तरी काही बाबतीत गोचराचा अनुकूल प्रभाव पाहावयास मिळू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय साधावा लागेल. मान-सन्मानात वृद्धी होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार सुद्धा करू शकता. सध्याच्या नोकरीत पदोन्नती संभवते. सरकारतर्फे लाभ होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवा. उपाय:-रोज गायत्री मंत्राच्या एक माळेचा जप करणे शुभ फलदायी होईल.
15 / 15
मीन: सूर्याचे कन्या राशीतील गोचर त्रासदायी होऊ शकते. दांपत्य जीवनावर विपरीत प्रभाव होत असल्याचे दिसू शकते. दांपत्य जीवनात मतभेदाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. सासुरवाडीकडील नातेसंबंधांवर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. कारकिर्दीत समाधान होणार नाही. त्याचा परिणाम कामावर होऊ शकतो. व्यावसायिक भागीदाराशी संबंधात काही तणाव असल्याचे दिसू शकते. निष्काळजीपणामुळे व्यापारात नुकसान होऊ शकते. काही नवीन ओळखी होतील. एखादे नवीन काम सुरू करावयाचे असल्यास सावध राहावे लागेल. सध्या खर्च जास्त होऊ शकेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण फलदायी होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास