शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तूळ संक्रांत: सूर्याचे गोचर ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; सावधगिरी अन् संयम बाळगा, काय करु नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 08:15 IST

1 / 9
ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याच महिन्यात दसरा, दिवाळीसारखे शुभ सण-उत्सव येत आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राशीपरिवर्तनाचा काही राशींवर शुभ प्रभाव दिसून येईल, तर काही राशीच्या व्यक्तींना संयमाने आणि सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. (sun transit in libra 2022)
2 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑक्टोबर रोजी बुधचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सुमारे महिन्याभरानंतर १६ नोव्हेंबर रोजी सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तूळ रास ही सूर्याची नीच रास मानली जाते. (surya in tula rashi sankranti 2022)
3 / 9
सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल ठरू शकेल. जवळपास महिनाभर अनेक राशींवर विपरीत परिणाम दिसू शकतो. देश आणि जागतिक राजकारणावर गोंधळाची परिस्थिती येऊ शकते. सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेश कोणत्या राशींना संमिश्र ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. जीवनात अनेक चढ-उतार येतील. तुमच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकेल. तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. या काळात तुम्ही अधिक स्वाभिमानी होऊ शकता.
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. काही गोष्टींमुळे चिडचिड होईल. रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. अन्यथा तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकेल. तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यासाठी कामाच्या ठिकाणी अधिक प्रयत्न करावे लागतील. या काळात तुम्ही घरगुती कामात जास्त व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्यावी. शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नका.
6 / 9
तूळ राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश याच राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. जीवनात खूप चढ-उतार येऊ शकतात. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता येऊ शकते. कौटुंबिक समस्यांमुळे चिडचिड होऊ शकते. यामुळे इतरांसोबतच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात वाढत्या खर्चामुळे समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कामे करण्यात अडचणी येऊ शकतात. या समस्यांमधून बाहेर पडणे तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी घाईघाईत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. वडिलांशी वाद होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने दिसत नाही. खूप पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतात. वादविवाद न करता चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्यावर भर द्यावा.
9 / 9
सूर्यानंतर शुक्र आणि बुधाच्या तूळ राशीतील प्रवेशानंतर अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. याचाही प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य