सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:12 IST
1 / 15नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतो. सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत विराजमान होत आहे. त्यामुळे आगामी महिन्याभराचा कर्क संक्रांत म्हणून ओळखला जाईल.2 / 15आताच्या घडीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह कर्क राशीत आहे. बुध आणि सूर्य यांच्या युतीने अतिशय शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. सूर्याचे चंद्राच्या राशीतील भ्रमण विशेष मानले जाते. 3 / 15सूर्याच्या कर्क संक्रांतीच्या काळात काही उपाय करणे लाभदायक मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती कमकुवत आहे किंवा अशुभ ग्रहांची प्रतिकूल दृष्टी आहे, अशा लोकांनी राशीनुसार काही उपाय अवश्य करावेत, असे म्हटले जाते. सूर्याची कर्क संक्रांत, बुधादित्य राजयोग यांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण शुभ फलदायी आहे. जीवनात प्रगती होईल. कारकिर्दीत यश प्राप्त होईल. व्यापारात लाभ होईल. एकंदरीत आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा सामंजस्य टिकून राहील. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावे. मसूर डाळ व गूळ दान केल्यास लाभ होईल.5 / 15वृषभ: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण सामान्य फलदायी आहे. असे असले तरी नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबियांशी संबंध सुधारतील. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. आरोग्य विषयक लहान-सहान समस्या उद्भवू शकतात. काळजी घ्यावी. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण करावे. पाण्यात अक्षता घालून सूर्यास अर्घ्य दिल्यास लाभ होईल.6 / 15मिथुन: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण उत्साहवर्धक आहे. कारकीर्दीत प्रगती होईल. नशिबाची साथ मिळेल. व्यापारानिमित्त प्रवासाची संधी मिळेल. असे असले तरी हे दिवस आव्हानात्मक होऊ शकतात. अशा वेळी आपणास सावध राहावे लागेल. उपाय:-दुर्वा मिश्रित पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे. 'ॐ रवये नम:' ह्या मंत्राचा जप फलद्रुप होऊ शकेल.7 / 15कर्क: सूर्याचे भ्रमण याच राशीतून होत आहे. महिनाभर सूर्य या राशीतच राहील. हे दिवस काहीसे आव्हानात्मक होऊ शकतात. स्वभावात अहंकार व क्रोध हे दोन्ही बघावयास मिळू शकतात. वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी मतभेद होऊ शकतात. ही स्थिती टाळण्यासाठी स्वतःला सकारात्मक व्हावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अति आत्मविश्वास टाळा. उपाय:-रोज गायत्री मंत्राचा जप करणे हितावह ठरेल.8 / 15सिंह: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण चांगले आहे. हे भ्रमण कारकिर्दीच्या दृष्टीने चांगले आहे. यशस्वी व्हाल. परंतु व्यापारात नुकसानीस सामोरे जावे लागू शकते. ह्या व्यतिरिक्त नाते संबंधात सावध राहावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण हितावह होईल.9 / 15कन्या: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण मिश्र फलदायी आहे. कारकिर्दीत थोडा दबाव असू शकतो. आर्थिकदृष्ट्या हे दिवस त्रासदायी होऊ शकतात. असे असले तरी कारकिर्दीत प्रगती होऊ शकते. नाते संबंधांची काळजी घ्यावी लागेल. नात्यात अहंकार बाजूस ठेवावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. उपाय:-सूर्य चालिसाचे पठण लाभदायी होईल.10 / 15तूळ: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण लाभदायी आहे. विविध स्रोतातून आर्थिक प्राप्ती होऊ शकते. कारकिर्दीच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहेत. प्रगती होऊ शकते. व्यावसायिक भागीदार सहकार्य करेल. वडिलांकडून लाभ होईल. उपाय:-रोज वडिलांच्या पाया पडून आपल्या दिवसाची सुरवात करावी. 'ॐ हिरण्यगर्भाय नमः' मंत्राचा जप करावा.11 / 15वृश्चिक: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण काहीसे आव्हानात्मक असणार आहे. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात नशिबाची साथ मिळेल. खर्च झाले तरी आर्थिक स्थिती चांगली असल्याने जास्त त्रास होणार नाही. मेहनतीवर भरवसा ठेवावा लागेल. नाते संबध जपावे. वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्य दाखवावे. उपाय:-कुंकू व लाल फुल मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ्य द्यावे. लाभ होईल.12 / 15धनु: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण सामान्य फलदायी असल्याचे दिसत आहे. कारकिर्दीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापारात नैराश्य येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हे दिवस विशेष असे काही असल्याचे दिसत नाही. आर्थिक नुकसान संभवते. नात्यातील सामंजस्य टिकवून ठेवावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्यावी. उपाय:-'ॐ आदित्याय नमः' मंत्राचा जप करावा. रामचरितमानस यातील श्लोकांचे पठण फलदायी होईल.13 / 15मकर: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण चांगले आहे. नाते संबंधात आनंद निर्माण करण्यास प्रेरित करेल. व्यापारात व नोकरीत थोडा त्रास होऊ शकतो. कोणाला उसने पैसे देऊ नये, अन्यथा पैसा अडकू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. तेव्हा सामंजस्य टिकवून ठेवावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उपाय:-गायत्री चालिसाचे पठण फायदेशीर ठरेल.14 / 15कुंभ: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण चांगले आहे. सूर्याचे हे भ्रमण नाते संबंधांसाठी काहीसे तणावपूर्ण होऊ शकते. कामाचा दबाव राहील. व्यापारात अपेक्षित लाभ होणार नाही. हे लक्षात ठेवावे. कर्ज घ्यावे लागू शकते. शत्रूंवर मात कराल. नात्यात सामंजस्य टिकवून ठेवावे. प्रकृतीच्या दृष्टीने हे दिवस विशेष चांगले नाहीत. निष्कारण काळजी करू नये. उपाय:-रोज हनुमान चालिसाचे पठण करावे. सूर्य दर्शन घेऊन कामास सुरुवात करावी.15 / 15मीन: सूर्याचे कर्क राशीतील भ्रमण शुभ फलदायी आहे. हे दिवस चांगले आहेत. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यात स्वारस्य दाखवाल. कारकिर्दीत प्रगती होईल. व्यापारात लाभ होईल. असे असले तरी नाते संबंधात तणाव जाणवू शकतो. कायदेशीर बाबीतून दिलासा मिळेल. उपाय:-भगवान विष्णूंच्या मंत्रांबरोबरच सूर्याच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा, लाभ होईल.