By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 07:00 IST
1 / 6१४ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. या दिवशी सूर्य, राहू आणि बुध यांचा त्रिग्रही योग असेल. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देव मेष राशीत सर्वोच्च स्थानावर आहे. परंतु मेष राशीमध्ये सूर्याला राहूने ग्रासले आहे, त्यामुळे २० एप्रिल रोजी सूर्य ग्रहण असेल. मात्र जेव्हा सूर्य बुधाशी जोडला जाईल तेव्हा बुधादित्य योग तयार होईल जो मेष राशी सह ५ राशींसाठी खूप शुभ फलदायी असेल.2 / 6सूर्य त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत भ्रमण करत आहे. अशा परिस्थितीत हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरेल. यासोबतच त्यांना नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात. आर्थिक बाबतीतही हा काळ त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गातील लोकांसाठीही हा काळ लाभदायक राहील. कौटुंबिक संबंधांच्या दृष्टीनेही मतभेद कमी होऊन सौख्य लाभेल. विवाहेच्छुकांसाठी शुभ काळ आहे. 3 / 6मेष राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. एवढेच नाही तर नोकरदार वर्गालाही चांगल्या संधी मिळतील. परदेश गमनाचे योग आहेत. व्यावसायिकांना चांगले भागीदार मिळून नव्या उंचीवर व्यवसाय नेता येईल. करतात त्यांना सुवर्ण संधी मिळू शकतात. त्यामुळे कमी कालावधीत भरपूर नफा कमवू शकता. दरम्यान आरोग्य चांगले राहील आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. 4 / 6कर्क राशीच्या लोकांसाठीही सूर्याचे भ्रमण खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी कराल. एवढेच नाही तर या काळात आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या राशीचे लोक जे परदेशात नोकरी करण्याचा विचार करत आहेत त्यांना या काळात चांगली संधी मिळू शकते. कौटुंबिक सुख मिळेल. मुलांकडून शुभ वार्ता समजतील. आर्थिक विकासासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरेल. आलेल्या पैशांचा योग्य विनिमय केलात तर भविष्यात चांगली संधी प्राप्त होईल. 5 / 6मेष राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि पदोन्नती मिळेल. इतकेच नाही तर हा काळ तुमच्यासाठी आर्थिक बाबतीतही खूप फायदेशीर असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांनाही व्यवसायात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन देखील खूप चांगले असेल. तुमची आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा भक्कम होईल. दूरच्या सहलीचे आयोजन करू शकता. 6 / 6मेष राशीत सूर्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप प्रगती होईल, तसेच हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. या दरम्यान, तुम्ही केलेल्या सर्व परिश्रमांची प्रशंसा होईल. व्यापारी वर्गातील जे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आता यश मिळू शकते. तसेच, या काळात तुम्हाला विविध स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळू शकतात. तुमचे प्रेम जीवन अधिक बहरेल आणि विवाह सौख्य लाभेल.