शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या 'या' चार राशींना देणार वर्षाअखेरीची 'खास' भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 11:52 IST

1 / 5
या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे. ३० डिसेंबर ही तिथी आहे. सोमवती अमावस्या ही भगवान शिवाला समर्पित असल्याने या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्येला अनेक दुर्मिळ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे ही अमावस्या विशेष असणार आहे. या अमावस्येला ध्रुव योग, धृती योग, स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत आहेत. हे योग चार राशींसाठी खास ठरणार आहेत.
2 / 5
सोमवती अमावस्या वृषभ राशीसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. ही तिथी तुमच्या आयुष्यात 'अच्छे दिन' घेऊन येणार आहे. उत्पन्नाच्या नवनव्या संधी प्राप्त होतील. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
3 / 5
कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सोमवती अमावस्या मोठा बदल घडवून आणू शकते. नोकरीत भाग्योदयाच्या संधी मिळतील. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मोठे यश मिळू शकते. ताण दूर होईल आणि नवीन वर्षांची दणक्यात सुरुवात होईल.
4 / 5
तूळ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या शुभ ठरणार आहे. नोकरदारांना मान-सन्मान, बढती, पगारवाढ मिळेल. आगामी वर्षात व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. व्यावसायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचे अनेक योग येतील. आरोग्य चांगले राहील. विवाहितांना चांगली बातमी मिळेल.
5 / 5
कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या सकारात्मक आणि अनुकूल ठरणार आहे. आगामी वर्षात करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. जुन्या परिचितांच्या भेटी होतील. व्यवसायात गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित कामातून आर्थिक लाभ होईल. जोडीदाराशी संबंध दृढ होतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यNew Year 2025नववर्षाचे स्वागत