शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 08:42 IST

1 / 12
सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाची सांगता होत आहे. भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे या चंद्रग्रहणावेळी मृत्यू पंचक लागणार आहे. यानंतर लगेचच पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात घटस्थापना होऊन नवरात्रारंभ होणार आहे.
2 / 12
यासह ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग, राजयोग, प्रतिकूल योग जुळून येत आहेत. सप्टेंबर महिन्यात शुक्र गोचराने सिंह राशीत चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. विद्यमान स्थितीत सिंह राशीत सूर्य, बुध आणि केतु विराजमान आहे. शुक्र गोचराने चतुर्ग्रही योग जुळून येईल. तसेच ग्रहण योगही जुळून येत आहे.
3 / 12
कुंभ राशीत असलेल्या राहुशी सिंह राशीतील या सर्व ग्रहांचा समसप्तक योग जुळून आलेला आहे. एकंदरीत ग्रहमान पाहता याचा अनेक राशींना सकारात्मक, अनुकूल आणि चांगला प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: अनुकूलता लाभू शकेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
5 / 12
वृषभ: भौतिक सुख मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. नवीन नोकरी शोधत असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. आत्मविश्वास शिगेला पोहोचेल. लोक वागण्याने, शैलीने आणि गोड स्वभावाने आकर्षित होतील. या काळात, तुमच्या सासू-सासऱ्यांशी नाते सुधारू शकेल.
6 / 12
कर्क: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना मानसिक शांती मिळेल. बोलण्याचा प्रभाव वाढेल. लोक प्रभावित होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
7 / 12
सिंह: आत्मविश्वास वाढेल. योजना यशस्वी होतील. लोकप्रियतेत वाढ होईल. करिअरच्या बाबतीत रवि आणि शुक्र फायदेशीर ठरतील. प्रतिष्ठाही वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागणार नाही. नवीन भागीदार व्यवसायात सामील होतील, जे खूप फायदेशीर ठरेल.
8 / 12
तूळ: सकारात्मक ठरू शकेल. कामात यश मिळेल. क्षमता चांगली वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. समाजात आदर मिळेल. व्यावसायिकांना आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागणार नाही. नवीन भागीदार व्यवसायात सामील होतील. नफा होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांमधील दुरावा कमी होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
9 / 12
वृश्चिक: लाभप्रद ठरू शकेल. काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. यश आणि मान्यता मिळण्याची सुवर्णसंधी घेऊन येईल. सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्याचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काळ अनुकूल आहे.
10 / 12
धनु: अनुकूल ठरू शकेल. उत्पन्नात वाढ दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीत सकारात्मक बदल दिसून येतील. विवाहितांना मानसिक शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल.
11 / 12
मकर: शुभ फलदायी ठरू शकेल. काम आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या दूर होतील. काम लक्ष केंद्रित करून करू शकाल. तर व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. नवीन भागीदार सामील होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक