शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Shravan Shukrawar 2022: शेवटच्या श्रावणी शुक्रवारी 'या' चार राशींच्या पदरात लक्ष्मी माता टाकणार भरघोस दान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 19:59 IST

1 / 6
आपल्या अपार कष्टांना जोवर नशिबाची साथ आणि लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभत नाही, तोवर कष्टाचे चीज होत नाही आणि यशस्वी म्हणून आपली गणनाही लोक करत नाहीत. मात्र पुढील चार राशींसाठी ही संधी आयती चालून आली आहे तर त्यांनी त्याचा निश्चित लाभ करून घ्यावा!
2 / 6
२६ आणि २७ ऑगस्ट अशा दोन दिवसांत श्रावण अमावस्या विभागून आली आहे. अमावस्या असूनही ती बाराही राशींसाठी अनुकूल असणार आहे, तरीदेखील पुढील चार राशी अधिक भाग्यवान म्हटल्या पाहिजेत!
3 / 6
वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळू शकते. जे नवीन काम सुरू करत आहेत, त्यांना खूप फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.
4 / 6
श्रावणी शुक्रवार भाग्यपालट करणारा ठरेल. नशीब त्यांना साथ देईल. पदोन्नती होऊ शकते, पगारवाढ होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. लवकरच एखाद्या सहलीला जाण्याचा योग येईल आणि आनंद दुणावेल.
5 / 6
धनु राशीच्या लोकांची आतापर्यंत रखडलेली कामे आता पटापट आणि निर्विघ्नपणे पूर्ण होतील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. आर्थिक अडचणींवर मात करता येईल. आनंदवार्ता समजतील!
6 / 6
मकर राशीच्या लोकांना जुन्या त्रासातून, आजारातून, आर्थिक प्रश्नातून सुटका मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळेल. आर्थिक वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषShravan Specialश्रावण स्पेशल